आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO :लढाऊ विमान पाडल्‍याने रशिया खवळला, सीरियाकडे मिसाइल क्रूजर पाठवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंकारा - सीरियातील इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी या लढाईत उतरलेल्या रशियाचे एक लढाऊ विमान तुर्कीने सिरियाच्या सीमेवर पाडल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. दरम्‍यान, यामुळे खवळलेल्‍या रशियाने आपल्‍या लढाऊ विमानांवर तुर्कीला सह‍जतेने निशाणा साधता येऊ नये, यासाठी एक क्षेपणास्‍त्र क्रूजर सीरियाच्‍या कोस्टर परिसराकडे रवाना केले. शिवाय दहशतवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्‍या या युद्धात तुर्कीची मदतही बंदी केली असून, जेथून लष्करी विमानांच्या हालचाली सुरू होतात त्‍या विमानतळांवर (एयरबेस) सुरक्षा वाढवली आहे.
रशियाच्या या लढाऊ विमानाने केवळ पाच मिनिटांत दहा वेळा तुर्कीच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केल्यानंतर दोन एफ-16 जातीच्या विमानांनी रशियन विमान पाडले. त्‍या नंतर दोन्‍ही देशांत तणाव निर्माण झाला.
रशियाने केल्‍या तीन मोठ्या घोषणा
>> लढाऊ विमानांच्‍या माध्‍यमातून आता स्ट्राइक ग्रुप्सचे सर्वर ऑपरेशन्स पटताळून पाहिले जातील.
>> वायू सुरक्षा वाढवण्‍यासाठी लताकिया कोस्टमध्‍ये मार्गदर्शक क्रूजर क्षेपणास्‍त्र 'मोस्क्वा' तैनात केले जाणार आहे. लढाऊ विमानांवर हल्‍ला होऊ शकतो, असा धोका वाटला तर त्‍वरित प्रत्‍युत्‍तर दिले जाईल.
>> तुर्कीसोबत असलेला सैन्‍य दलाचा करार रद्द करण्‍यात आला.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...