आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वय 34 वर्षे; जन्मत:च हात नाहीत, तरी तिरंदाजीत बनला अमेरिकन नॅशनल चॅम्पियन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडियाना- सुवर्णलक्ष्य भेदणारा हा फाेटाे अाहे तिरंदाज मार्क स्टट्जमॅनचा. त्याने अमेरिकन तिरंदाजी चॅम्पियनशिपच्या टार्गेट गटामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली अाणि अाेपन कंपाउंड गटात राैप्यपदक पटकावले. ही पदके त्याने साधारण तिरंदाजांच्या अाव्हानाचा सामना करताना पटकावले अाहेत. मार्कला जन्मत:च हात नाहीत. सुरुवातीला ताे पॅरा तिरंदाजी स्पर्धेत सहभागी हाेत हाेता. २०१२ लंडन पॅरालिम्पिक स्पर्धेत त्याने राैप्यपदकही जिंकले हाेते. मात्र, त्याने यंदा सर्वसाधारण गटामध्ये सहभाग घेतला. मार्कने २०१५ मध्ये २८३.४७ मीटर निशाणा साधला. यासह त्याने गिनीज बुक अाॅफ रेकाॅर्डमध्ये नाेंद केली.   

करिअरसाठी सुरू केली तिरंदाजी  
हात नसल्यामुळे मार्कला नाेकरी मिळत नव्हती. २००९ मध्ये त्याने एके दिवशी टीव्हीवर तिरंदाजी चॅम्पियनशिप पाहिली हाेती. त्याला रिव्हाॅल्व्हर चालवण्याचे ज्ञान हाेते. त्यामुळे त्याने तिरंदाजी शिकण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने गुगल सर्च केले. मात्र, यात ताे अयपशी ठरला. त्यानंतर त्याने स्वत: तिरंदाजी शिकण्यास सुरुवात केली.  

जर मला हे शक्य अाहे, तर तुम्ही का पळवाट शाेधता?  
हात नसलेला मनुष्य जगातील सर्वाेेत्कृष्ट तिरंदाजांसाेबत माेठ्या धाडसाने सामना करू शकताे अाणि सुवर्णलक्ष्य भेदताे. तर, तुम्ही तुमची स्वप्नपूर्ती का करत नाही? पळवाटा शाेधू नका, उठा अाणि लक्ष्य गाठा.  
- मार्क स्टट्जमॅन.
बातम्या आणखी आहेत...