आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्रेंच अाेपन : अॅना, टाॅमस बर्डिच विजयी, निशिकाेई, लुका पराभवासह स्पर्धेतून बाहेर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - जगातील माजी नंबर वन अॅना इव्हानाेविक मारिया शारापाेवा व टाॅमस बर्डिचने फ्रेंच अाेपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत दिमाखदारपणे प्रवेश केला. या दोघांनीही शानदार विजयासह हे यश संपादन केले. मात्र, पाेलंडची रंदावास्का बाहेर पडली.

सर्बियाच्या अॅना इव्हानाेविकने महिला एकेरीच्या सलामी सामन्यात कझाकिस्तानच्या याराेस्लावा श्वेदाेवाचा पराभव केला. सातव्या मानांकित इव्हानाेविकने रंगतदार सामन्यात ४-६, ६-२, ६-० अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासाठी तिला तीन सेटपर्यंत झुंज द्यावी लागली. गचाळ सुरुवात केल्याचा तिला पहिल्याच सेटमध्ये फटका बसला. सर्बियाच्या खेळाडूने केलेल्या चुकांचा फायदा घेत याराेस्लावाने पहिल्या सेटमध्ये बाजी मारली.

बर्नाडचा राेमहर्षक विजय
अाॅस्ट्रेलियन टेनिसपटू बर्नाड टाॅमिकने पहिल्या फेरीत राेमहर्षक विजय मिळवला. त्याने पुरुष एकेरीच्या सलामी सामन्यात इटलीच्या लुका वान्नीवर मात केली. त्याने ६-३, ३-६, ६-३, ६-४ ने सामना जिंकला. यासह त्याने दुसऱ्या फेरीत धडक मारली. मात्र, अखेरच्या मिनिटांपर्यंत झंुज देणाऱ्या इटलीच्या लुकाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.

रंदावास्काचे अाव्हान संपुष्टात
पाेलंडची अग्निजस्का रंदावास्काचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. तिला महिला एकेेरीच्या सलामी सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. तिला जर्मनीच्या अन्निका बेकने पराभूत केले. अन्निकाने ६-२, ३-६, ६-१ ने सनसनाटी विजयाची नाेंद केली. यासह तिने महिला एकेरीची दुसरी फेरी गाठली. स्पर्धेतील हा पहिला धक्कादायक पराभव ठरला.

टाॅमस बर्डिचचा विजय
चाैथ्या मानांकित टाॅमस बर्डिचने पुरुष एकेरीच्या सलामी सामन्यात शानदार विजयाची नाेंद केली. त्याने लढतीमध्ये जपानच्या क्वालिफायर खेळाडू याेशिहिताे निशिकाेईचा पराभव केला. बर्डिचने ६-०, ७-५, ६-३ ने सामना जिंकला. या वेळी जपानच्या युवा खेळाडूने विजयाची दिलेली झुंज अपयशी ठरली. त्याने झुंज देत सामना तीन सेटपर्यंत खेचला हाेता.

शारापाेवा दुसऱ्या फेरीत
गत विजेत्या मारिया शारापाेवाने दुसरी फेरी गाठली. तिने महिला एकेरीच्या सलामी सामन्यात एस्ताेनियाच्या काईया कानेपीवर ६-२, ६-४ ने मात केली. तसेच समंथा स्टाेसुरने अमेरिकेच्या ब्रेंगलला ६-१, ६-३ ने पराभूत केले.
बातम्या आणखी आहेत...