आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्स निवडणूक: माझी मुलगी पेन राष्ट्राध्यक्ष पदासाठी लायक नाही; उमेदवाराच्या वडिलांचे वक्तव्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस- फ्रान्सच्या मतदारांनी रविवारी राष्ट्राध्यक्ष पदासाठी ऐतिहासिक मतदान केले. प्रचारादरम्यान दोन्ही बाजूने अत्यंत असभ्य भाषेचा वापर झाला. मतदान सुरू होण्याच्या काही वेळ अगोदर प्रमुख उमेदवार मरीन ली पेन यांचे वडील ज्यां मेरी ली पेन म्हणाले, माझी मुलगी राष्ट्राध्यक्ष पदासाठी लायक नाही. दुसरीकडे युरोप व उद्योग क्षेत्रातील समर्थकांचा कौल पाहता मॅक्रोन अधिक असल्याचा अंदाज वर्तवला जातो.

रविवारी मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. त्याच्या पहिल्याच सत्रात मॅक्रोन व  ली पेन यांनी आपला हक्क बजावला. मॅक्रोन यांनी पत्नीसह मतदान केले. पहिल्यांदाच निवडणुकीत फ्रान्सचा एकही प्रमुख पक्ष उतरलेला नाही. राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा आेलांद यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आणि त्यांच्या पक्षाचे उमेदवार पहिल्या फेरीतूनच बाद झाले.

पुद्दुचेरीमध्येही मतदान 
एकेकाळी फ्रान्सची वसाहत राहिलेला भारतातील प्रदेशातही मतदान झाले. त्यात पुद्दुचेरीचाही समावेश आहे. त्यात ४६०० मतदार आहेत. त्यासाठी कराईकल व चेन्नईमध्येही मतदान केंद्र तयार करण्यात आले होते.
बातम्या आणखी आहेत...