आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mark Zekurburg Answers To Questions Of Celebraties And Fans

प्रत्येकच दिवस मजेशीर नसतो, सेलिब्रिटी आणि चाहत्यांशी झुकेरबर्गच्या गप्पा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग मंगळवारी रात्री उशीरा फेसबुकवर लाइव्ह होते. तासाभराच्या सत्रात जगभरातील लोकांनी त्यांना प्रश्न विचारले. त्यांना प्रश्न विचारणाऱ्यांत हॉलीवूड अभिनेता अर्नाल्ड श्वार्जनेगर व प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्जचाही समावेश होता. सेलिब्रिटिज व चाहत्यांनी फिटनेसपासून आनंदाचे परिमाण, एक डॉलर वेतन आणि फेसबुकच्या भवितव्याबाबत प्रश्न विचारले...

अर्नाल्ड श्वार्जनेगर यांचे प्रश्न
{एवढे व्यस्त असूनही फिटनेससाठी काय करता?
फिटनेससाठी आठवड्यांतून तीन दिवस व्यायाम आणि घरी दररोज सकाळी माझ्या डॉगीसोबत पळतो.
{यंत्रे मानवावर विजय मि‌ळवतील?
यंत्रे आपल्यावर कधीच विजय मिळवू शकणार नाहीत.
स्टीफन हॉकिंग्स
{ विज्ञानाकडून तुम्हाला कोणत्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत?

मेंदू कसे काम करतो ? समाज वा एखाद्या व्यक्तिशी आपण मैत्रीचे नाते कसे निर्माण करतो ? त्यामागे कोणते गणित वा फंडा आहे ?
चाहत्यांचे प्रश्न
{फक्त एक डॉलर वेतन का घेता?
कारण मी भरपूर पैसा कमावला आहे. फेसबुक बाहेरही लोकांच्या कल्याणासाठी काही काही करता यावे म्हणून आता मी शिक्षण, आरोग्य व तंत्रज्ञानाशी संबंधित समाजसेवेवर लक्ष केंद्रीत करत आहे. अशी संधी फारच कमी लोकांना मिळते.
{भविष्यातील फेसबुक कसे असेल?
आम्ही लोकांच्या चर्चेची पद्धत बदलण्यावर काम करत आहोत.एक दिवस मेजेस प्रमाणेच आपले विचार आणि भावनाही एकमेकांना पाठवू शकू, असा विश्वास आहे. ते उत्कृष्ट संवाद तंत्रज्ञान असेल.
{झोपेतून उठलो आणि फेसबुक गायब झाले तर काय करावे?
तर मी ते पुन्हा निर्माण करेन.
{निर्मनुष्य ठिकाणी पाठवायचेे तर सोबत कोणत्या तीन वस्तू न्याल?
पत्नी, डॉगी व पुस्तके.
{बिल गेट्सप्रमाणे खुर्चीच्या वरून उडी मारू शकाल काय?
कदाचित हो, पण आत्ताच तसे करून नक्की उत्तर देऊ शकेल असे वाटत नाही.
{तुमच्या मते आनंदाची परिभाषा कोणती?
प्रत्येक दिवसच मजेशीर असतोच असे नाही. मात्र दररोज केलेले कोणतेही एक काम तुम्हाला व इतरांनाही आनंद देईल. नात्यात गुंतवणूक करा.काळानुरुप आनंद वाढेलच.