कॅलिफोर्निया (अमेरिका) - मार्क झुकेरबर्गने प्रथमच
फेसबुकवर फॅन्स आणि यूजर्ससोबत \'Live Q&A\' व्हिडिओ सेशन केले. एक तासांच्या या सेशनमध्ये त्यांनी सोशल मीडिया, कनेक्टिव्हिटी, आर्टिफिशियल इंटीलिजन्स, व्हर्च्यूअल रियालिटी आणि इंटरनेच्या ताकदीबाबतच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ते म्हणाले, \'सोशल मीडिया मानवते संबंधीच्या प्रश्नांची उत्तरे शोधू शकतो आणि जगात शांतता प्रस्थापित करण्यास सहाय्यभूत ठरू शकतो.\'
काय झाले या सेशनमध्ये..
- हे सेशन मंगळवारी रात्री 12 वाजता सुरु होऊन 1 पर्यंत चालले.
- मार्क झुकेरबर्गने चाहते आणि युजर्ससोबत अशा प्रकारचे व्हिडिओ सेशन करण्याची ही पहिलीच वेळ होती.
- भारतातूनही मार्क यांना प्रश्न विचारण्यात आले होते. त्यात जयपूर येथील एका व्यक्तीने कनेक्टिव्हिटी आणि कानपूरमधील यूजरने आर्टिफिशियल इंटीलिजन्स व व्हर्च्यूअल रियालिटी संदर्भात प्रश्न विचारले.
Q - फेसबुक चार्जेबल होणार का ?
झुकेरबर्ग - असे कधीही होणार नाही, ही सर्व्हीस कायम फ्री मिळत राहील.
Q - सोशल मीडिया लोकांना जोडण्यासाठी आणि शांततेसाठी काही करणार का ?
झुकेरबर्ग - ही अशी बाब आहे ज्यात आम्ही काहीतरी मिळवले आहे आणि त्यासाठी मला आपल्या समाजाचा अभिमान आहे. जगात कुठेही कोणतेही दुर्घटना झाली तर आम्ही काय मदत करु शकतो याचा विचार करतो. नेपाळमध्ये भूकंप आला होता तेव्हा आम्ही सर्वांनी पीडितांसाठी आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या आठवड्यातही याची प्रचिती आली. गे क्लबवर झालेल्या हल्ल्यानंतर फायरिंगचे शिकार झालेल्यासाठी सगळे धावून गेले.
जयपूर येथील एका व्यक्तीने कनेक्टिव्हीटी संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर मार्क यांचे उत्तर होते,
झुकेरबर्ग - आम्ही लोकांना जोडण्याचे काम करोत. त्यांना शेअर करण्याची पॉवर देत आहोत. जर मी पुन्हा फेसबुक सुरु केले तर मी फेसबुकबद्दल एकदम वेगळ्या पद्धतीने विचार करेल.
- मी फेसबुकला एका वेबसाइट सारखे सुरु करणार नाही. जर तुम्ही मला जंगलामध्ये सोडले किंवा वाळवंटात सोडले तर मी तेथून बाहेर पडण्या ऐवजी लोकांना कसे जोडता येईल याचा मार्ग शोधेल आणि त्यावरच फोकस करेल. परिस्थिती कशी आहे हे महत्त्वाचे नाही.