आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्क झुकेरबर्गने दिली पनामा कालव्याला भेट, जगातील महत्त्वांच्या आश्चर्यामध्ये होतो समावेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग सध्या पनामा कालव्याच्या सफरीवर आहे. मार्क सध्या INTERNET.ORG च्या टीमसोबत विश्वभ्रमंतीवर आहे. याच दरम्यान तो जगप्रसिध्द अशा पनामा कालव्याच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी तेथे पोहोचला. मार्कने त्याच्या या सफरीचे फोटो त्याच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.
काय आहे पनामा कालवा?
पनामा कालवा हा मध्य अमेरिकेच्या पनामा देशामधील एक कृत्रीम कालवा आहे. हा कालवा अटलांटिक महासागराच्या कॅरिबियन समुद्राला प्रशांत महासागरासोबत जोडतो. इ.स. १९१४ साली वाहतूकीसाठी खुला करण्यात आलेला पनामा कालवा जगातील सर्वात महत्त्वाच्या व वर्दळीच्या जलमार्गांपैकी एक आहे. हा कालवा वापरणाऱ्या जहाजांची वार्षिक संख्या १९१४ साली १००० होती तर २००८ पर्यंत ही संख्या १४,७०२ पर्यंत पोचली होती. २००८ सालापर्यंत एकूण ८.१५ लाख जहाजांनी पनामा कालव्याचा वापर केला होता.
ह्या कालव्याच्या बांधणीसाठी अनेक नैसर्गिक व कृत्रीम तलावांचा वापर करण्यात आला. हे तलाव समुद्रसपाटीपासून सुमारे २६ मी उंच असल्यामुळे पनामा कालव्यामध्ये दोन्ही बाजूंना बंदिस्त बांध (लॉक्स) बांधले आहेत. ह्या बांधांमध्ये अनुक्रमे पाणी सोडत आत शिरणाऱ्या जहाजांना वर चढवले जाते. कालव्यामधून बाहेर पडणाऱ्या जहाजांसाठी उलटी क्रिया करून खाली उतरवले जाते. सध्याच्या घडीला ह्या बांधांची रूंदी ११० फूट आहे. पनामा कालव्याची एकूण लांबी ७७.१ किमी (४८ मैल) आहे.

पुढील स्लाईडवर पाहा, मार्क झुकेरबर्ग याचे पनामा कालव्याच्या भेटी दरम्यानचे आणि सोबतच पनामा कालव्यातून जाणाऱ्या जहाजांचे फोटो