आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झुकेरबर्गने केले इंटरनेट डॉट ओआरजीचे समर्थन, मोफत सेवांनी न्यूट्रिलिटीवर परिणाम नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - नेट न्यूट्रिलिटीवर चर्चा सुरू असतानाच फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्गने इंटरनेट डॉट आेआरजी प्लॅटफॉर्मच्या बाजूने आपले मत मांडले आहे. त्यामुळे कोट्यवधी लोकांचा फायदा होणार आहे. भारतात ते आरकॉम नेटवर्कवर उपलब्ध आहे. फेसबुकच्या नेतृत्वाखाली अनेक कंपन्यांनी मिळून इंटरनेेेेट डॉट आेआरजी प्लॅटफाॅर्म तयार केला आहे. त्या माध्यमातून सुमारे ३० वेबसाइटचा अॅक्सेस शक्य होतो.

झुकेरबर्गच्या म्हणण्यानुसार भारतात युनिव्हर्सल कनेक्टिव्हिटी आणि नेट न्यूट्रिलिटी सोबत सुरू ठेवता येऊ शकते. इंटरनेटच्या विविध योजना देशातील नेट न्यूट्रिलिटी तत्त्वाला हरताळ फासणाऱ्या ठरतील, अशी चर्चा सध्या भारतात सुरू असतानाच झुकेरबर्ग यांचे हे वक्तव्य जारी झाले आहे. आम्हाला त्याच्या प्रगतीवर गर्व आहे. काही लोकांनी झीरो रेटिंग कन्सेप्टर टीका केली आहे. काही सेवा मोफत उपलब्ध करून दिल्यास त्याचा नेट न्यूट्रिलिटीच्या तत्त्वावर काही परिणाम होतो.
मेक माय ट्रिप, क्लिअरट्रिपही सोबत
पर्यटनासंबंधीचे मेक माय पोर्टल, क्लिअरट्रिप या पोर्टलनीही स्वत:ला इंटरनेट डॉट आेआरजीपासून वेगळे ठेवले आहे. मेक माय ट्रिपने शुक्रवारी नेट न्यूट्रिलिटीचे समर्थन केले. न्यूट्रिलिटीमुळे संशोधनवृत्तीला चालना मिळेल आणि देशाच्या आर्थिक विकासाचा वेगही वाढण्यात मदत होईल, असे कंपनीने म्हटले आहे.