Home »International »Other Country» Markets In Rio De Janeiros Slums Known As Crackland

नशेत उद्ध्वस्त झाली या लोकांची LIFE, देहविक्री-गँगवॉर बनला जीवनाचा भाग

दिव्य मराठी वेब टीम | Sep 12, 2017, 12:22 PM IST

इंटरनॅशनल डेस्क - येथील लोकांचे आयुष्य नैराश्य, दारिद्री आणि गुन्हेगारीने भरले आहे. हे चित्र ब्राझिलची राजधानी रिओ डी जेनेरिओचे आहे. राजधानीतील ही झोपडपट्टी फक्त आणि फक्त अमली पदार्थ आणि गुन्हेगारी कृत्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. देहविक्रय, खून, दरोडा, गँगवॉर आणि हिंसाचार येथील लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत.
अमेरिकन पत्रकाराने टाकला प्रकाश
अमेरिकन पत्रकार मार्टिन रॉझर्स यांनी येथे राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला आहे. या झोपडपट्टीत हजारो लोक वास्तव्य करत आहेत. ते सगळेच अतिशय गलिच्छ आणि दयनीय अवस्थेत जगत आहेत. हा परिसर ब्राझीलचा सर्वात कुप्रसिद्ध आणि गुन्हेगारी परिसर म्हणून कुख्यात झाला आहे. याचे सर्वात मोठे कारण येथील स्थानिकांना असलेले अमली पदार्थांचे व्यसन मानले जात आहे. येथे राहणाऱ्या सर्वांनाच अमली पदार्थांनी उद्ध्वस्त केले आहे.
सरकारी प्रयत्नांनाही अपयश
ब्राझिल सरकारने येथील लोकांचे आयुष्य रुळावर आणण्यासाठी विविध पुनर्वसन आणि व्यसनमुक्ती कार्यक्रम हाती घेतले. मात्र, त्याचा या लोकांवर काहीच परिणाम झालेला नाही. येथील स्थानिकांनीच सामान्य जीवन जगण्यास नकार दिला आहे. कुठल्याही सामाजिक सुधारणेच्या कार्यक्रमात ही वस्ती सहभाग घेत नाही. सरकारसह एनजीओंचेसुद्धा हे लोक काहीच ऐकून घेण्यास तयार नाहीत.
देहविक्रीत अडकल्या अल्पवयीन मुली
याच परिसरातून दूर जाऊन व्यसन सोडलेल्या सेलियो रिकाडरे यांनी सांगितल्याप्रमाणे, अमली पदार्थांनी येथील लोकांचे आयुष्य बरबाद केले आहे. आपले मित्र परिवार अजुनही याच वस्तीमध्ये असल्याने ते वेळोवेली त्यांची भेट घेण्यासाठी येतात. अमली पदार्थांमुळे अगदी लहान वयाच्या मुला-मुलींना सुद्धा व्यसन लागले आहे. लहान मुलींच्या व्यसनाचा गैरफायदा घेत त्यांना देहविक्रीत ढकलले जात आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, ब्राझिलच्या सर्वात कुप्रसिद्ध परिसरातील फोटोज...

Next Article

Recommended