आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नासाचा मार्स रोव्हर क्युरॉसिटीला मंगळावर सापडला ‘पिरॅमिड’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन (अमेरिका)- मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर फिरत असलेल्या नासाच्या क्युरॉसिटी या रोव्हरला अगदी इजिप्तच्या पिरॅमिडसारखी प्रतिकृती सापडली आहे. याचे फोटो काढून या रोव्हरने पृथ्वीवर पाठवले आहेत. खगोलतज्ज्ञ या प्रतिकृतीचा उलगडा करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
फोटोमध्ये दिसून येणारा पिरॅमिड मंगळावरील एखाद्या संस्कृतीची निषाणी असल्याची शक्यता आहे, असे मत स्पेस सायंसमध्ये फिक्शन लिहिणाऱ्यांनी व्यक्त केले आहे. या पिरॅमिडचा आकार एखाद्या कारएवढा आहे. केवळ योगायोगाने हा पिरॅमिड तयार झाला असावा, असेही काही खगोलतज्ज्ञ सांगत आहेत. हवेच्या प्रचंड वेगामुळे या दगडाला पिरॅमिडसारखा आकार मिळाला असावा, असेही काहींनी सांगितले आहे.
युट्यूब चॅनल पॅरानॉर्मलक्युबिकलने मात्र वेगळीच भूमिका मांडली आहे. या दगडाचा आकार बघितला तर तो व्यवस्थितपणे घडवण्यात आला आहे, असे दिसून येते. केवळ वेगवान हवेमुळे असा आकार मिळू शकत नाही. तसेच प्रकाश आणि अंधारामुळे अशा स्वरुपाचा फोटो तयार होऊ शकत नाही. कदाचित जमिनीच्या आत मोठा पिरॅमीड असू शकतो. फोटोत दिसणारा पिरॅमिड केवळ त्याचे टोक असावे असेही सांगितले जात आहे.
मंगळाच्या फोटोंमध्ये सापडलेल्या संशयास्पद आकृत्यांबद्दल अनेकांनी यापूर्वी अनेक कल्पना मांडल्या आहेत. पण त्या कल्पना सिद्ध करता येतील एवढे ठोस पुरावे मात्र मिळालेले नाहीत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, दुरुन कसा दिसतो हा पिरॅमिड... मंगळावर दिसते मानवी आकृती...