आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MARSHAL GO IN THE INTERNATIONAL COURT AGAINST India, PAK, AND ENGLAND

‘मार्शल’कडून भारत, पाकिस्तान, ब्रिटनविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेग-प्रशांत महासागरातील मार्शल बेटांच्या समूहाने भारत, पाकिस्तान आणि ब्रिटनच्या विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात वेगवेगळे खटले दाखल केले आहेत. हे देश आण्विक स्पर्धा रोखण्यात अयशस्वी ठरले, असा ठपका ठेवला आहे. आता या प्रकरणाची सुनावणी ते १६ मार्चदरम्यान आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार आहे. तेव्हाच सर्व गोष्टी स्पष्ट होतील.

भारत आणि पाकिस्तानच्या विरोधात खटला चालवण्याचा अधिकार आहे किंवा नाही, याचा निर्णय आंतरराष्ट्रीय न्यायालयाला अगोदर घ्यावा लागणार आहे. दोन्ही देशांनी अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर अद्यापही स्वाक्षरी केलेली नाही. ब्रिटनने काही आक्षेप घेतले आहेत. त्यावर कोर्ट विचार करेल. त्यानंतर या खटल्यात सुनावणी घ्यायची किंवा नाही, याचा निर्णय घेतला जाईल.