आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अझहरला दहशतवादी घोषित करण्यातील अडथळा दूर, चीन भारतविरोधी भूमिका घेण्याची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्र - जैश-ए-मोहंमदचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यातील गतिरोध लवकरच दूर होणार आहे. चीनने तांत्रिकरीत्या ही घोषणा करण्यास अटकाव केला होता. त्याचा महिन्यांचा अवधी आता संपत आहे. पठाणकोट हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी भारताने संयुक्त राष्ट्रांत केली होती. पुन्हा बीजिंगने यात गतिरोध निर्माण केला नाही तर त्याला लवकरच आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात येईल.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीमध्ये नकाराधिकार वापरून ३१ मार्च रोजी चीनने भारताच्या प्रस्तावाला रोखले होते. जैश-ए-मोहंमद संघटन दहशतवादी संघटनांच्या यादीत असूनही मसूदला मात्र तसे घोषित करण्यात आले नव्हते. १५ सदस्यीय समितीमध्ये केवळ चीननेच यावर अंकुश आणला होता हे विशेष. भारताच्या प्रस्तावाला इतर १४ सदस्य देशांनी मंजुरी दिली आहे.
मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यास त्याची संपत्ती गोठवता येते. तसेच त्याच्या प्रवासावर बंदी घालणे कायद्याने शक्य होते.

१०आठवड्यांनी अवधी संपणार :चीनच्या गतिरोधाचा अवधी १० आठवड्यांनंतर संपेल. चीनच्या नकाराधिकाराचा अवधी संपत आला असल्याचे सूत्रांनी सांगितले. चीनने पुन्हा तीच भूमिका घेऊन आपल्या नकाराधिकाराचा वापर केला, तरच अडचणी निर्माण होतील. अन्यथा मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत सामील होईल.

चीन एकटा भूमिका घेईल काय?
संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीद्वारे जागतिक स्तरावर दहशतवाद निर्मूलनासाठी वारंवार आवाहन करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत सदस्य राष्ट्रांची मंजुरी असलेल्या भारताच्या प्रस्तावावर चीन पुन्हा अंकुश आणेल का? एकटा चीन दहशतवादाला पोषक भूमिका घेईल का? वर्ष २००१ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी जैश-ए-मोहंमदला दहशतवादी संघटन म्हणून घोषित केले होते. आता चीनच्या भूमिकेकडे सदस्य देशांचे डोळे आहेत. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनने भारताला पूर्ण समर्थन दिले आहे.
बातम्या आणखी आहेत...