आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mass Graves Of 1700 Iraqi Soldiers Found In Tikrit

इराक: तिक्रीतमध्ये आढळले सामूहिकरित्या दफन केलेले 1700 सैनिकांचे मृतदेह!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिक्रीत- इराकमधील तिक्रीत शहरात काही सामूहिक दफन केलेले मृतदेह आढळून आले आहेत. ज्यात सुमारे 1700 इराकी सैनिकांचे मृतदेह आढळून आले. मानवाधिकार संघटनांनी म्हटले आहे की, हे मृतदेह इराकी सैनिकांचे असून, गेल्या वर्षी इसिसच्या दहशतवाद्यांनी तिक्रीतमधील एका इराकी सैनिकांच्या तळावर हल्ला करून त्याला मारले होते.
CNN चॅनेलच्या माहितीनुसार, फॉरेन्सिक टीमने एक दफनभूमीतून नऊ मृतदेह काढून डीएनए चाचणीसाठी बगदादमधील लॅबमध्ये पाठवले आहेत. दफन केलेले मृतदेह बाहेर काढताच इराकी सैनिकांनी आपल्या मारल्या गेलेल्या सहका-यांच्या सन्मानासाठी हवेत सात गोळ्या मारून मानवंदना दिली व इराकचे राष्ट्रगीत गायले.
जे मृतदेह मिळाले आहेत ते संपूर्णपणे सडलेल्या अवस्थेत आहेत. ज्यातील काहींचे हाथ मागून बांधण्यात आले आहेत. अशाप्रकारचे मृतदेह तिक्रीतमधील प्रेसीडेंट पॅलेसजवळील आठ दफनभूमी आढळून आले तर शहराच्या बाहेरील भागातील दोन दफनभूमीत हीच स्थिती होती. आपल्याला माहित असेलच की तिकरितमधील प्रेंसीडेंट पॅलेसला इसिसने आपला अड्डा बनविला होता. त्यानंतर झालेल्या भीषण लढाईनंतर इराकी सेनेने तिकरित शहर ताब्यात घेतले आहे. इराकमधील एका सैनिकाने सांगितले की, गेल्या वर्षी जूनमध्ये शेकडो सैनिकांचे अपहरण केले होते व त्यांना आपल्या कब्जात ठेवले होते. त्यावेळी इसिसने या सैनिकांच्या बदल्यात आपले साथीदार सोडण्याची मागणी केली होती. इराक सरकारने मात्र इसिसचे दहशतवादी सोडले नव्हते. त्यानंतर इसिसच्या दहशतवाद्यांवी सर्व सैनिकांची हत्या करून त्यांचे तिक्रीतमधील विविध दफनभूमीत 1700 सैनिकांचे दफन केल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, तिक्रीतमधील मिळालेले सामूहिक दफनभूमीतील फोटोज...