आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडन: 27 मजली टॉवरला आग लागल्यानंतर फ्रिजचा स्फोट, मुलांना 10व्या मजल्यावरून फेकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ब्रिटनची राजधानी लंडनमधील 27 मजली ग्रेनफेल टॉवरला स्थानिक वेळेनुसार मंगळवारी रात्री दीड वाजता आग लागली. आग वेगाने सर्व मजल्यांवर पसरली. यात 6 लोक मृत्यूमुखी पडले असून 30 पेक्षा जास्त जखमी आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार, आग लागल्यामुळे एका फ्लॅटमधील फ्रिजचा स्फोट झाला. मात्र, फायर सर्व्हिसने सध्याच काही सांगता येत नसल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षदर्शीनच्या म्हणण्यानुसार, काही पालकांनी आगीपासून वाचण्यासाठी आपल्या मुलांना 10व्या मजल्यावरुन खाली फेकले. आतमध्ये अडकलेल्या लोकांना अग्निशामक दलाच्या जवानांनी सुरक्षित बाहेर काढले. तर, प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की आगीवर नियंत्रण मिळवण्यापूर्वी काही लोक पांढरे कपडे फडकावत मदतीची याचना करत होते. 
 
टॉवरच्या 120 फ्लॅट्समध्ये राहातात 600 लोक
- पोलिस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी अनेकांना बेडशीटमध्ये गुंडाळून सुरक्षित बाहेर काढले. काही लोकांना धुरामुळे श्वासोच्छावासाचा त्रास झाला. जवळपास 30 जणांना शहरातील पाच हॉस्पिटल्समध्ये दाखल करण्यात आले आहे. 
- वेस्ट लंडनमधील ग्रेनफेल टॉवरमधील 120 फ्लॅटमध्ये जवळपास 600 लोक राहातात. 1974 मध्ये या टॉवरचे निर्माण झाले आहे. 
- या टॉवरमधील बहुतेक फ्लॅटमध्ये मुस्लिम समुदायाचे लोक राहातात. सध्या रमजान सुरु असल्यामुळे अनेक लोक सेहरीसाठी पहाटे लवकर उठले होते. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. 

'बीबीसी'च्या वृत्तानुसार, 11 व्या मजल्यावर एक महिला मदतीची मागणी करत होती. तिच्यासोबत एक मुलगाही होता.
- डाना अली (30) आई मारिया आणि वडील खालिद यांच्यासोबत 10 व्या मजल्यावर अडकले होते. तिने फोन करून सांगितले की, ते लिव्हिंग रूममध्ये अडकले आहोत. टॉवरमध्ये धूर आणि आगीचे लोट पसरले आहेत. त्यामुळे आम्ही सर्व दरवाजे-खिडक्या बंद केल्या आहेत.
 
तिघांना हॉस्पिटलमध्ये हलवले...
- पोलिसांनी काही जणांना सुरक्षित बाहेर काढले आहे. धुरात गुदमरल्याने अनेकांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
- आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून व्हिडिओ...छायाचित्रांमधून पाहा... लंडनमधील आगीची भीषणता...
बातम्या आणखी आहेत...