आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या राजाच्या अंत्यसंस्कारावर खर्च होणार 582 कोटी, गतवर्षी झाले निधन...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजधानीत खास क्रिमेटोरियम बनवण्यात आला आहे. - Divya Marathi
राजधानीत खास क्रिमेटोरियम बनवण्यात आला आहे.
इंटरनॅशनल डेस्क - थायलंडमध्ये ईश्वराप्रमाणे पूज्य असलेले दिवंगत राजा भूमिबोल अदुल्यदेज यांच्या अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण झाली आहे. 70 वर्षे थायलंडचे राजा राहिलेले अदुल्यदेज यांना 5 दिवसांच्या रॉयल सेरेमनीत अखेरचा निरोप दिला जाणार आहे. थायलंडचे 9 वे राजा भूमिबोल यांचे गतवर्षी ऑक्टोबरमध्ये वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. यानंतर साऱ्या देशात एका वर्षाचा शोक जाहीर करण्यात आला होता.
 
 
अंत्यसंस्कारावर खर्च होणार 3 अब्ज बाह्त (582 कोटी रुपये)
- त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी 26 ऑक्टोबरची तारीख निश्चित करण्यात आली आहे. देशाच्या लष्करशाही सरकारने यासाठी 3 अब्ज बाह्त एवढा निधी जाहीर केला आहे. 
- यानंतर राजाचे पुत्र महा वजीरालोंगकोर्न यांना देशाचा नवीन राजा घोषित केले जाणार आहे. 
- राजधानी बँकॉक येथील सनम लुआंग क्रिमेटोरियमध्ये हा अंत्यविधी पार पडणार असून त्या ठिकाणी मोठा जनसमुदाय गोळा होणार अशी शक्यता आहे. अंत्यविधीनंतर राजा स्वर्गात जातील असे स्थानिकांचे म्हणणे आहे. 
- चकरी शाही परिवारातून आलेले राजा भूमिबोल 1946 मध्ये थायलंडचे राजा बनले होते. या दरम्यान त्यांनी थायलंडच्या लोकांना एकत्रित आणणे आणि शांततेसाठी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांचे नाव जगभरातील सर्वात श्रीमंत राजांमध्ये केली जात होती.
- राजा भूमिबोल 200 वर्षे जुनी परमपरा असलेल्या चकरी राजघराण्याचे 9 वे राजा होते. राजा म्हणून सर्वाधिक काळ विराजमान राहण्याचा मान त्यांनाच जातो. 
- त्यांच्या 70 वर्षांच्या कारकिर्दीत देशात 12 पंतप्रधान बदलले तसेच जवळपास 10 वेळा लष्करी तख्तपालटाचा प्रयत्न करण्यात आला आहे.
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...