आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील बाॅम्बहल्ल्यातील मृतांची संख्या 94 वर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूल- अमेरिकेने अफगाणिस्तानात टाकलेल्या बाॅम्ब हल्ल्यातील मृतांची संख्या ९४ वर पोहोचली आहे. अमेरिकेने अणूरहित हल्ला केला. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेतील खात्मा झालेल्या दहशतवाद्यांची संख्या ३६ वरून ९४ च्या घरात गेली आहे. अचिन जिल्ह्यात हा बाॅम्ब टाकण्यात आला होता. मृतांची संख्या वाढू शकते, असा अंदाज संरक्षण विभागाकडून अगोदरच वर्तवण्यात आला होता. हल्ल्यात कोणीही नागरिक मृत्युमुखी पडल्याचे वृत्त नाही. 
 
अमेरिकी लष्कर व अफगाण सरकार यांच्यात अतिशय चांगला समन्वय आहे. त्यामुळेच अमेरिकेने केलेली कारवाई अतिशय अचूक झाली. निष्पाप नागरिकांचा मृत्यू होऊ नये, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले होते. 
 
अफगाणमध्ये ६००-८००  इसिसचे दहशतवादी...
अफगाणिस्तानात इसिसचे ६००- ७०० दहशतवादी असल्याचा अमेरिकेचा अंदाज आहे. नानगरहार भागात हे दहशतवादी दडून बसले असावेत.
बातम्या आणखी आहेत...