आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमर मन्सूर ड्रोन हल्ल्यात ठार, पाहा आर्मी स्कूलमध्ये असे माजले होते मृत्यूचे तांडव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकिस्तानातील पेशावरमधील लष्करी शाळेवरील अतिरेकी हल्ल्याचा मास्टरमाइंड उमर मन्सूर अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमधील नानगरहर प्रांतात ड्रोन हल्ला केला. त्यात उमर मन्सूरचा मृत्यू झाल्याचे वृत्त 'डॉन' वृत्तवाहिनीलाने दिले आहे.

डिसेंबर 2014 मध्ये पेशावरमधील आर्मी स्कूलमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ला झाला होता. 'तहरिक-ए-तालिबान संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती. या हल्ल्याचा मास्टरमाइंड उमर मन्सूर व त्याचा साथीदार कारी सैफुल्लाह ठार झाल्याचा दावा
पाकिस्तानी लष्कराच्या अधिकार्‍यांनी केला आहे.

असा माजवला मृत्यू तांडव :
- 16 डिसेंबर, 2014 रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास पाकिस्तानी आर्मीच्या गणवेशात सात तालिबानी अतिरेकी स्कूलच्या मागील दरवाजाने शिरले.
- स्वयंचलित शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले अतिरेक्यांनी स्कूलच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये हल्ला केला. विद्यार्थ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. सर्व विद्यार्थी यावेळी प्रथमोपचाराच्या प्रशिक्षणासाठी ऑडिटोरियम हॉलमध्ये जमले होते.
- यानंतर अतिरेक्यांनी एकेका वर्गात घुसून अंदाधुंद गोळीबार केला. काही मिनिटांमध्‍ये स्कूलच्या प्रत्येक वर्गात मृतदेहांचा सडा पडला होता.

प्राचार्यांना जिवंत जाळले :
- क्रुर अतिरेक्यांनी मुलांसमोर स्कूलचे प्राचार्या ताहिरा काजी यांना जिवंत जाळले होते.
- अतिरेक्यांनी विद्यार्थ्यांना रांगेत उभे करुन त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
- मृत्यू तांडव जवळजवळ 40 मिनिटे चालल्यानंतर पाकिस्तान लष्‍कराने मोर्चा सांभाळला.
- सहा तास सुरु असलेल्या मोहिमेत लष्‍कर आणि अतिरेक्यांममध्ये दरम्यान तुफान चकमक उडाली. पाक लष्काराला सातही अतिरेक्यांना ठार मारण्यात यश आले होते.
- या हल्ल्यात 144 जणांचा मृत्यू झाला होता. यात 122 शाळकरी विद्यार्थी आणि 22 कर्मचार्‍यांना ठार करण्यात आले होते.

पुढील स्लाइडवर पाहा, क्रुरकर्मा उमर मन्सूरच्या इशार्‍यावर सात अतिरेक्यांनी असे माजवले होते पेशावरमधील आर्मी स्कूलमध्ये मृत्यूचे तांडव... असा पडला होता चिमुकल्यांच्या रक्ताचा सडा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...