आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला शाेषणाविरुद्धचे ‘मी-टू कॅम्पेन' टाइम पर्सन ऑफ द इयर; या वर्षी बनले आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क सिटी- महिलांवरील हिंसाचाराविरुद्ध सुरू झालेले ‘मी-टू कॅम्पेन’ २०१७चे टाइम पर्सन ऑफ द इयर ठरले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प दुसऱ्या, चीनचे  शी जिनपिंग  तिसऱ्या स्थानी राहिले. महिला हिंसाचार व शोषणाविरुद्ध आवाज उठवत जगभरातील महिलांनी मी-टू अभियान सुरू केले. ३ कोटी लोकांनी त्यात सहभागी झाले. मी-टू कॅम्पेनसह १५ व्यांदा एखाद्या समूह वा अभियानाला हा किताब मिळाला आहे. 

 

२००६ मध्ये आले मी-टू, या वर्षी बनले आंदोलन
- सामाजिक कार्यकर्त्या टराना बुर्के यांनी लैंगिक शोषणाविरुद्ध २००६ मध्ये आंदोलन छेडले. पीडितांनी मी-टू शब्दाने अभिव्यक्त व्हावे, असे आवाहन त्यांनी केले होेते. 
- २०१७ मध्ये पुन्हा एकदा हा शब्द चर्चेत आला. निर्माता हार्वे विन्स्टीनने आपल्यासह इतर अभिनेत्रींचे लैंगिक शोषण केल्याचे अभिनेत्री एलिसाने सांगून खळबळ उडवून दिली.
- यानंतर जगभरात महिलांनी मी-टू शब्द वापरून आपल्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली. २४ तासांत फेसबुकवर १.२० कोटी पोस्ट तर ट्विटरवर ५० लाख ट्विट झाले.  

बातम्या आणखी आहेत...