आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'फॉक्स न्यूज\'चा दावा: \'गन कंट्रोल\'वर स्पीच देताना कांदा लावून रडले ओबामा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- देशांतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यावर भाषण करताना व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना रडू कोसळले. मात्र, ओबामांचे अश्रू खोटे असल्याचा दावा 'फॉक्स न्यूज' टीव्ही चॅनलने केला आहे.

बराक ओबामा गेल्या मंगळवारी रात्री व्हाइट हाऊसमध्ये गन कंट्रोल पॉलिसीच्या कार्यक्रमात बोलत होते. देशात सहजपणे होत असलेल्या शस्त्र व बंदुकांच्या गैरवापराबाबत ओबामांनी चिंता व्यक्त केली होती. अवैध बंदुकीच्या वापरावर निर्बंध घालण्याच्या मुद्द्यावर ओबामा खूपच भावूक झाले. त्यांना यावेळी आपले अश्रू आवरता आले नव्हते. ओबामांचे अश्रू पाहून सभागृहातील लोक अवाक् झाले होते.

अमेरिकेत मागील काही वर्षात झालेल्या गोळीबारामध्ये तब्बल 10,000 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यावेळी ओबामांनी तीन वर्षांपूर्वी कनेक्टिकटच्या न्यू टाऊन मधील एका शाळेत झालेल्या गोळीबारात 20 मुले ठार झाल्याचा उल्लेख केला. यावेळी ओबामा भावूक झाले होते. मात्र, ओबामांचे अश्रू हे रडणे नाटकी होते. डोळ्यात अश्रू आणण्यासाठी ओबामांनी कांद्यांच्या वापर केल्याचे 'फॉक्स न्यूज'ने म्हटले आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, बराक ओबामांचा 'तो' व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...