आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Media Emperor Rupert Murdoch Going To Marry Fourth Time

माध्यम सम्राट मर्डोक चौथ्यांदा बोहल्यावर, अमेरिकन मॉडेलबरोबर करणार विवाह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात माध्यम सम्राट म्हणून ओळख असलेले रुपर्ट मर्डोक वयाच्या ८४व्या वर्षी बोहल्यावर चढणार आहेत. विशेष म्हणजे त्यांचा हा चौथा विवाह असून अमेरिकन आघाडीची मॉडेल जेरी हॉल यांच्याशी ते विवाहबद्ध होत आहेत.
मर्डोक यांची मालकी असलेल्या ‘द टाइम्स’ या वृत्तपत्रातच या आगळ्या-वेगळ्या विवाहाबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. मर्डोक यांना पहिल्या तीन पत्नींपासून सहा मुले आहेत. या जोडीतील मर्डोक ८४ वर्षांचे तर त्यांची नववधू जेरी ५९ वर्षांच्या आहेत. जेरी यांनाही पूर्वीच्या जोडीदारापासून ४ मुले आहेत. जेरी जवळपास २३ वर्षे गायक मिक जॅगर याच्यासोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होत्या. जॅगरपासूनच त्यांना ४ मुले आहेत. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील विवाहांमुळे मर्डोक सतत चर्चेत राहिले अाहेत.

लंडनमध्ये जुळले दोन मनांचे धागे
रुपर्ट मर्डोक आणि जेरी हे दोघे लंडनमधील ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड रग्बी वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यादरम्यान एकत्र दिसले होते. सध्या अमेरिकेत स्थायिक असलेले ऑस्ट्रेलियन वंशाचे मर्डोक यांनी तिसरी पत्नी वेन्डी डेंग हिला २०१३ मध्ये सोडचिट्ठी दिली होती. गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यातही जेरी आणि मर्डोक एकत्र होते.