आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्करोगाच्या निदानासाठी श्वान ठरतात प्रभावी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ब्रिटनच्या बंकिमशायरमध्ये श्वान कर्करोग पीडित व्यक्तींच्या मूत्राचे नमुने हुंगून कर्करोग आहे अथवा नाही याचे निदान करतील. ‘मेडिकल डिटेक्शन डॉग्ज’ च्या मुख्यालयात श्वानांना मूत्राचे नमुने देऊन प्रोस्टेट कर्करोगाचे निदान करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. ९३%अचूक निदान श्वान करू शकतात असे सिद्ध झाले आहे.

चॅरिटी संघटनेच्या संस्थापक क्लेअर गेस्ट सांगतात की त्यांच्या फॉक्स रेड लॅब्रेडॉर डॉगी डेजीने २००९ मध्ये त्यांच्या स्तनात ट्यूमर असल्याचे संकेत दिले होते. ती त्याला हुंगत. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. श्वान नमुन्यांना तल्लखतेने हुंगतात व आेळखतात. ऑलिम्पिक मैदानाच्या दुप्पट क्षेत्रफळ असलेल्या तरणतलावात एक चमचा साखर असेल तर ती देखील श्वान आेळखू शकतात. ‘मेडिकल डिटेक्शन डॉग्ज’ च्या कर्मचाऱ्यांना आशा आहे की वैद्यकीय तज्ज्ञ लवकरच निदानासाठी श्वानांची मदत घेऊ लागतील. पहिल्या टप्प्यात कर्करोगाचे निदान न होणे हे त्याच्या मृत्यूंच्या संख्येतील वाढीचे मुख्य कारण आहे. मात्र श्वानांना प्रशिक्षित केल्यास पहिल्याच टप्प्यात निदान होईल. त्यामुळे लाखो लोकांचे जीव वाचतील.

पाळीव श्वानांना दिले जाते प्रशिक्षण : येथे आसपासच्या घरांमध्ये पाळल्या जाणाऱ्या श्वानांना प्रशिक्षण दिले जाते. स्वयंसेवक त्यांना घेऊन येतात. त्यांना मूत्राचे व पेशींचे नमुने हुंगवले जातात. त्याचे प्रशिक्षण दिले जाते. दिवसभर हे प्रशिक्षण देऊन पुन्हा त्यांना मालकाकडे सोडण्यात येते.

डेझीने वाचवले अनेकांचे प्राण : संस्थापक क्लेअर यांनी स्वत:चा अनुभव सांगितला. डेझी माझ्या शरीराच्या एका भागावर खाजवल्यासारखे करू लागली. माझ्या स्तनात गाठ असल्याचे मला कळले. डॉक्टरांनीही नंतर कर्करोग सांगितला.

असे देतात प्रशिक्षण
- प्रशिक्षक जैवविच्छेदन प्रयोगशाळेत धातुच्या भांड्यात १ एमएमचा नमुना ठेवतात.
- त्यानंतर एका श्वानाला हँडलरच्या खोलीत सोडले जाते. श्वानाला सर्व नमुने हुंगवले जातात.
- एका सेकंदात श्वान कर्करोगाचा नमुना शोधतात. कर्करोगाच्या संसर्गाचा नमुना असेल तर तिथे बसण्याचे प्रशिक्षण त्यांना दिले जाते.
बातम्या आणखी आहेत...