आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इबोला विषाणूवरील जालीम उपचार व औषधाचा शोध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोरांटो- रक्तस्राव होऊन ताप येण्यास कारणीभूत ठरणाऱ्या इबोलासारख्या विषाणूचा प्रतिकार करू शकणाऱ्या औषधाचा शोध लागल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. या विषाणूचा फैलाव जलदगतीने होत असल्यामुळे मानवी आरोग्यावर त्याचा घातक परिणाम होत आहे.

इबोलासारख्या संसर्गजन्य आजारावर जालीम उपचार व औषध पद्धती विकसित झाली नाही. मर्यादित आर्थिक स्रोत असणाऱ्या विकसनशील देशांमध्ये या संसर्गाचा उद्रेक होतो. अशा विषाणूंचा संसर्ग वेगाने होतो आणि त्याचा रोगप्रतिकार शक्तीवर विपरीत परिणाम होतो. आमचे संशोधन विषाणूवरील अल्पमुदतीच्या उपचार पद्धतीशी संबंधित नाही. मात्र, याचा उपयोग लस विकसित करण्यासाठी होऊ शकतो,असे युनिव्हर्सिटी ऑफ मोन्ट्रेयलमधील प्रमुख संशोधक नॉर्मंड क्यार यांनी सांंगितले. रक्तस्रावाशी संबंधित रिफ्ट व्हॅली फीव्हर विषाणूवर आणखी संशोधन केल्यास जीवघेण्या विषाणू संसर्गावर उपचार पद्धती विकसित होऊ शकते, असे क्यार म्हणाले. संबंधित विषाणूच्या व्हायरल प्रोटीनवर अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी न्यूक्लिअर मॅग्नेटिक रिझोनन्स (एनएमआर) स्पेक्ट्रोस्कोपीचा उपयोग केला.