आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या शहरातून झाला दहशतवाद्यांचा सफाया, अशा अवस्थेत निघत आहेत स्थानिक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - गेल्या 3 वर्षांपासून जगातील सर्वात क्रूर दहशतवादी संघटन आयएसच्या विळख्यात जगणाऱ्या इराकचे मोसूल शहर अखेर दहशतवाद्यांपासून मुक्त झाले. हजारो दहशतवाद्यांचा खात्मा झाला, उर्वरीत दहशतवादी इतरत्र पसार झाले. मात्र, या शहरातील लोकांची दयना अजुनही संपलेली नाही. इराकी लष्कर आणि स्वयंसेवक दिवसरात्र या नरकात जीवंत उरलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत. जखमींसाठी तात्पुरते रुगणालये लावण्यात आले आहेत. जखमी सैनिकांवर सुद्धा या ठिकाणी उपचार सुरू आहेत. मात्र, या सर्वांमध्ये बालकांची संख्या सर्वाधिक असून त्यांचे असे हाल बचाव पथकाच्याही डोळ्यात पाणी येत आहे. 
 
 
पाण्यासाठी तरसले...
- मोसूल शहर एकेकाळी इसिसची इराकमधील राजधानी म्हणून कुप्रसिद्ध झाली होती. दिवसाढवळ्या सर्वांसमोर, कुणाला पिंजऱ्यात बांधून जाळण्याचे, तर कुणाला उंच इमारतीवरून हात पाय बांधून फेकण्यासह तलवारीने शिर धडापासून वेगळे करण्याचे प्रकार घडले आहेत. 
- स्वतःला इस्लामिक स्टेट म्हणवून घेणाऱ्या या संघटेने जातानाही जागो-जागी भूसुरुंगा लावण्यात आल्या आहेत. त्याच्या स्फोटांमध्ये दररोज स्थानिकांनी आपले हात-पाय गमवण्याच्या आणि ठार होण्याच्या घटना घडत आहेत. 
- अशाच लोकांना वाचवण्याचे आणि ढिगारांमधून बाहेर काढण्यासह त्यांच्यावर उपचाराचे काम सध्या मोसूल शहरात सुरू आहे. कित्येक अबाल-वृद्ध चकमकींच्या कोंडीत सापडून उपाषी होता. अनेकांचा उपासमारीने मृत्यू झाला. त्यापैकी जे जीवंत उरले ते कुपोषित झाले आहेत. 
- सैनिक आणि दहशतवाद्यांच्या धुमश्चक्रीत या स्थानिकांच्या नशीबात पिण्याची पाणी सुद्धा आले नाही. लाखो लोकांना दूषित नाल्यातील पाणी प्यावे लागले. त्यामुळे, त्यांच्या पोटात विविध प्रकारचे इंफेक्शन झाले आहेत. त्यांच्यावर या शिबीरांमध्ये उपचार सुरू आहेत. 
- काही रुगणांचे तर असे हाल आहेत, की त्यांना चिकीत्सकांच्या शिबीरांपर्यंत आणता येत नाही. अशा लोकांवर स्वतः डॉक्टर जाऊन उपचार करत आहेत. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, बचावकार्यात अशा अवस्थेत निघत आहेत लोक...
बातम्या आणखी आहेत...