आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हा स्टायलिश शिख बनू शकतो कॅनडाचा PM; येथे वाचा त्यांच्याबद्दल...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - कॅनडाच्या इतिहासात प्रथमच एक शिख व्यक्ती पंतप्रधान पदाची उमेदवार होणार आहे. कॅनडातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय पक्षांपैकी एक न्यू डेमोक्रेटिक पार्टीने (NDP) जगमीत सिंग यांना आपला नेता निवडले आहे. बहुमताने झालेल्या निवडीनंतर जगमीत 2019 मध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार होणार आहेत. आगामी निवडणुकीत ते कॅनडाचे विद्यमान पंतप्रधान जस्टिन ट्रिडू यांना टक्कर देतील. 
 
 
संभावित पीएमबद्दल...
>> 2 जानेवारी 1979 रोजी कॅनडातील ऑनटेरियो प्रांतात जगमीत सिंग यांचा जन्म झाला. 
>> शिख पगडी घालून प्रांतीय विधीमंडळात प्रवेश घेणारे, शिख म्हणून संघीय पक्षाचे नेतृत्व करणारे आणि कॅनडामध्ये डेप्युटी नेते पद भूषविणारे ते पहिलेच आहेत. 
>> 2019 च्या निवडणुकींची घोषणा होण्यापूर्वीच जगमीत सिंग देशभर लोकप्रीय झाले आहेत. त्यांचा स्टाइल आणि विचार लोकांना आवडत आहेत. वर्णद्वेष अतिशय प्रेमाने संपविणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. 
>> जगमीत यांना सायकल चालवणे खूप आवडते. त्यांच्या इंस्टाग्रामवर असलेल्या फोटोजपैकी बहुतांश फोटोजमध्ये ते सायकलजवळ किंवा सायकल चालवताना दिसून येतात. आपण पंतप्रधान पदी निवडून आल्यास देशव्यापी सायकल धोरण राबविणार असे त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. 
>> अतिशय साजेल असे जेंटलमन कपडे परिधान करण्यासाठी ओळखले जाणारे जगमीत यांना नुकतेच 'टोरोंटो लाइफ' कडून बेस्ट ड्रेस्ड म्हणून घोषित करण्यात आले आहे. 
>> एक वकील म्हणून सुरुवात करणारे जगमीत यांनी काही वर्षांतच राजकारणात पदार्पण केले. आपल्या मनमिळावू स्वभाव आणि स्वॅगने त्यांनी स्थानिकांच्या मनात घर केले आहे. 
 

यामुळे नेहमी राहतात स्टायलिश
आपण एवढे स्टायलिश का राहतो याचा उलगडा त्यांनीच केला आहे. लहानपणी ते भेदभाव आणि वर्णद्वेषाला सामोरे गेले आहेत. नेहमीच लोक त्यांच्याकडे घुरून पाहत होते. लोकांना माझ्याकडे पाहायचेच असेल तर मी देखील पाहण्यासारखाच होऊन त्यांना का दिसू नये या विचारासह त्यांनी स्टायलिश राहण्यास सुरुवात केली. 
 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, स्टायलिश शिख जगमीत सिंग यांचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...