आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हा दिसतोय 10 वर्षांचा मुलगा, मात्र वय आहे 26

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण कोरियाचा पीटर पॅन नाव असलेला ह्योमयुंग शिन. - Divya Marathi
दक्षिण कोरियाचा पीटर पॅन नाव असलेला ह्योमयुंग शिन.
छायाचित्रात तुम्हाला दक्षिण कोरियाचे ह्योमयुंग शिन दिसत आहे. तो एका 10 वर्षांच्या शाळकरी मुलांप्रमाणे दिसत आहे. मात्र तो 26 वर्षांचा आहे. पीटर पॅन नावाने प्रसिध्‍द असलेल्या ह्योमयुंग जेव्हा आठवड्याच्या शेवटी नाइट क्लब्समध्‍ये बिअरवर बिअर पितो, तेव्हा आसपास असलेल्या लोक आश्‍चर्यचकित होऊन जातात. प्रत्यक्षात तो दुर्मिळ हायलँडर सिंड्रोम या आजाराने पीडित आहे. या कारणामुळे त्याचे शारीरिक आणि मानसिक विकास थांबला आहे. ह्योमयुंग आपल्या निष्‍पाप चेहरा आणि बारीक आवाजामुळे लोक त्यांना लहान मुलगाच समजतात. या कारणास्तव त्याला आपले वयाचे ओळखपत्र दाखवावे लागते. याने लोकांना कळते त्याचा जन्म 1989 मधील आहे.

एका स्थानिक दूरचित्र वाहिनीने ह्योमयुंगवर डॉक्युमेंट्रीही बनवली आहे. यात त्याच्या घरात हॉलीवूड अभिनेत्री स्कारलेट जॉन्सनचे छायाचित्र दिसत आहे. तिच्यासारखी एखादी मैत्रीण मिळावी, जी त्याच्या भावना समजून घेईल आणि संपूर्ण आयुष्‍य राहिल. या डॉक्युमेंट्रीमध्‍ये ह्योमयुंग म्हणतो, की अद्याप त्याने पौगंडावस्था प्राप्त केलेली नाही. वय जास्त दिसावे म्हणून तो मेकअपचा आधार घेतो. परंतु त्याने त्याला कोणताही फायदा झाला नाही.

पुढील स्लाइड्सवर पाहा, 26 वर्षांच्या या मुलाचे काही छायाचित्रे...