आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet The Two Young Mom's Who Breastfeed Each Others Children

जगावेळी आहे या तरुणींची मैत्री, एकमेकींच्या बाळांना देतात स्तनपान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिस्टल (डावीकडून) आणि स्टेफनी (उजवीकडे) एकमेकींच्‍या मुला-मलीला स्‍तनपान देताना. - Divya Marathi
क्रिस्टल (डावीकडून) आणि स्टेफनी (उजवीकडे) एकमेकींच्‍या मुला-मलीला स्‍तनपान देताना.
लंडन - रक्‍ताच्‍या नात्‍यापेक्षा मैत्रीचे नाते जवळचे आहे, असे म्‍हणतात. त्‍यामुळेच समाजात वेळोवेळी आदर्श मैत्रीचे दाखले दिले जातात. पण, फेसबुकसारख्‍या अभाशी जगात ओळख होऊनसुद्धा स्टेफनी टाटाविट्टो आणि क्रिस्टल क्लेइन या दोघींची मैत्री मैलाचा दगड ठरली आहे. पाच वर्षांपूर्वी या दोघींची फेसबुकवर ओळख झाली. ओळखीचे रुपांतर दृढ मैत्रीत झाले. आता लग्‍नानंतर एकमेकींच्‍या बाळांच्‍या पालनपोषणापर्यंत हा प्रवास येऊन ठेपला आहे.
एक जाते रात्रपाळीला दुसरी पाजते दूध
दोघीही एका खासगी कंपनीमध्‍ये नोकरीला आहेत. महिन्‍यातून एक आठवडा त्‍यांना रात्रपाळीचे काम करावे लागते. पण, दोघींचीही मुलं तान्‍हे आहेत. ज्‍या मैत्रिणीची रात्रपाळी आहे त्‍या काळात दुसरी मैत्रीण आपल्‍या तान्‍हुल्‍यासोबत तिच्‍याही बाळाची देखभाल करते. एवढेच नाही तर आपल्‍या पोटच्‍या गोळ्याप्रमाणे स्‍तनपानही देते. क्रिस्टलची मुलगी 19 महिन्यांची आहे. स्टेफनीचा मुलगा दोन वर्षांचा आहे. स्टेफनी आजही आठवड्यातून किमान सहा वेळा क्रिस्टलच्या मुलीला स्तनपान करते.

नाते अजून दृढ झाले
क्रिस्टल म्हणाल्या, ''हे पाहून इतर महिला काय म्हणतील, याचा विचार मी करत नाही. मुलांना स्तनपान करणे नैसर्गिक आहे. माझ्या कुटुंबासाठी आवश्यक आणि चांगली असलेली गोष्ट मी करत आहे. त्यामुळे आमच्या मुलांबरोबरच दोघीतील नाते देखील आणखी घट्ट बनले आहे.

कडवट टीकाही झाली
या दोघी एकमेकींच्‍या मुलांना स्‍तनपान देतात, हे पाहून त्‍यांच्‍या मित्रपरिवाराकडून त्‍यांच्‍यावर कडवट टीकासुद्धा झाली. अनेकांनी तर अशा प्रकारे पाजण्यातून मुलांना एचआयव्हीचा धोका होऊ शकतो, अशी भीतीही दाखवली. परंतु, त्‍या दोघींचा एकमेकींवर विश्वास कायम आहे.
पतीने दिली खंबीर साथ
क्रिस्टल म्‍हणाल्‍या, ''माझ्या या निर्णयाचा पतीने कधीही विरोध केला नाही, उलट प्रोत्‍साहन दिले'', असे त्‍यांनी सांगितले. स्टेफनीने सिगारेट आणि ड्रिंक करणेही सोडून दिले. आम्ही गरोदर राहिल्यानंतर केलेल्या चाचणीत सर्वकाही नॉर्मल असल्याचे निष्कर्ष आला होता.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...