आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कार्फशिवाय सौदीत पोहचली मलेनिया ट्रम्प, या वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसली इंवाका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौदीतील दौ-यावर मलेनिया... - Divya Marathi
सौदीतील दौ-यावर मलेनिया...
इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एका दिवसाच्या दौ-यावर सौदी अरेबियात पोहचले आहेत. त्यांच्या समवेत फर्स्ट लेडी मलेनिया ट्रम्प आणि मुलगी इंवाका सुद्धा होती. दोघींही येथे संपूर्ण शरीर झाकलेल्या कपड्यात दिसल्या. मात्र, दोघींनीही डोक्यावर स्कार्फ घातला नाही. ते ही अशावेळी जेव्हा ट्रम्प यांनी स्कार्फ न घातल्याने मिशेल ओबामा यांच्यावर टीका केली होती. ब्लॅक जम्पसूटमध्ये दिसली फर्स्ट लेडी...
 
- ट्रम्प यांचे एयरफोर्स वन जेव्हा रियादचे किंग खालिद इंटरनॅशनल एयरपोर्टवर उतरले तेव्हा मलेनिया ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये नजरेस पडली. 
- 47 वर्षाची ही माजी मॉडेलने स्टेला मॅककॉर्टनीचा जम्पसूट घातला होता तर वेस्टवर गोल्डन कलरचा बेल्ट बांधला होता.  
- मात्र, अशा कट्टरपंथी देशात गेल्यानंतरही मलेनियाने स्कार्फ घातला नाही. कारण सौदीत महिलांसाठीही हा सक्तीचा व कडक कायदा आहे. 
- ट्रम्प यांची मुलगी आणि सल्लागार इवांका ट्रम्प सुद्धा प्रिंटेड मॅक्सी ड्रेसमध्ये दिसली, तिनेही हेडस्कार्फ घातला नव्हता.  
- सौदीतील कटक नियम व कायद्यानुसार तेथील महिला व पर्यटक महिला (फिमेल विजिटर्स) यांनी सुद्धा तो पेहराव करणे बंधनकारक आहे.
 
मिशेल यांनी सुद्धा नव्हता घातला स्कार्फ-
 
- जानेवारी 2015 मध्ये माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा किंग अब्दुल्लाह यांच्या मृत्यूनंतर ओबामासमवेत सौदी अरेबियात पोहचली होती. 
- या दरम्यान मिशेलने सुद्धा संपूर्ण शरीर झाकलेले कपडे घातले होते. मात्र डोक्यावर स्कार्फ घातला नव्हता. यामुळे ट्रम्प यांनी मिशेल यांच्यावर टीका केली होती.  
- ट्रम्प यांनी तेव्हा टि्वट केले होते की, खूप लोक सौदी अरेबियात हेडस्कार्फ न घातल्याने कौतूक करत आहेत पण हा सौदीतील लोकांचा अपमान झाला आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मलेनिया आणि इंवाकाचे सौदी दौ-यातील फोटोज...
बातम्या आणखी आहेत...