आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: ...आणि मेलानिया यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा हात झटकला, दोघांत बिनसले?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रम्प- मेलानिया यांचा इस्त्रायल दौरा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. विमानतळावर फर्स्ट लेडी मेलानिया यांनी पती ट्रम्प यांचा हात पकडण्यास दिलेला नकार हे त्याचे कारण ठरले. - Divya Marathi
ट्रम्प- मेलानिया यांचा इस्त्रायल दौरा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. विमानतळावर फर्स्ट लेडी मेलानिया यांनी पती ट्रम्प यांचा हात पकडण्यास दिलेला नकार हे त्याचे कारण ठरले.
जेरूसलेम- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सहकुटुंब गेल्या काही दिवसापासून आपल्या पहिल्या-वहिल्या विदेश दौ-यावर आहेत. सौदी अरेबियापासून सुरु केलेल्या या दौ-यात त्यांनी तेथील किंग सलमान यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सोमवारी इस्त्रायल गाठले. मंगळवारी पॅलेस्टाईनला भेट दिल्यानंतर बुधवारी व्हॅटिकन सिटी गाठत पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. या दरम्यान पोप यांनी ट्रम्प यांनी जगात शांतता नांदण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती केली.
 
दरम्यान, ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांचा सोमवारी पार पडलेला इस्त्रायल दौरा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. यांचे कारण म्हणजे विमानतळावर फर्स्ट लेडी मेलानिया यांनी पती डोनाल्ड ट्रम्प यांचा हात पकडण्यास दिलेला नकार. मेलानिया आणि ट्रम्प यांच्यात सध्या सर्वकाही आलबेल नसल्याचेच यातून संकेत मिळाले. यानंतर अमेरिकसह जगभर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून सोशल मिडियात डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली उडविली जात आहे.
 
काय आहे संपूर्ण प्रकरण-
 
- आपल्या पहिल्या- वहिल्या विदेशी दौ-यावर असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी सौदी अरेबियाहून इस्त्रायल येथे पोहचले. 
- यावेळी ट्रम्प यांचे स्वागत करण्यासाठी तेल अव्हिव विमानतळानर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे पत्नीसह पोहचले होते.
- ट्रम्प-मेलानियाचे स्वागत केल्यानंतर नेतान्याहू या जोडीला रेड कार्पेटवरून घेऊन जावू लागले.
- यादरम्यान ट्रम्प हे नेतान्याहू यांच्याशी संवाद साधत होते. बोलण्याच्या ओघात पत्नी मेलानिया काहीशी मागे राहिल्याचे ट्रम्प यांच्या लक्षात आले नाही.
- त्यावेळी नेतान्याहू, त्यांची पत्नी व ट्रम्प हे तिघे समांतर चालत होते तर मेलानिया मागे राहिल्या होत्या. मात्र, काही वेळातच ही बाब ट्रम्प यांच्या लक्षात आली. 
- त्यामुळे ट्रम्प यांनी समयसूचकता दाखवत मेलानियाला हात देऊन बरोबर घेण्याचा प्रयत्न केला मात्र तोवर फर्स्ट लेडीचा राग अनावर झाला होता.
- ट्रम्प यांनी तीन-चारदा हात देऊनही मेलानिया यांनी ट्रम्प यांचा हात हातात घेण्यास टाळले व राष्ट्राध्यक्षांना टाळले व त्या पुढे निघून गेल्या.
- रेड कार्पेटवरून चाललेल्या या दोन राष्ट्रप्रमुखाची छबी टिपण्यासाठी थांबलेल्या कॅमे-यामध्ये ही बाब ठळकपणे दिसली. नंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. 
- सोशल मिडियात हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नेटिझन्सनी ट्रम्प यांची जोरदार खिल्ली उडवली गेली.
 
रोममध्येही दिसला दोघांचा वाद-
 
- डोनाल्ड ट्रम्प बुधवारी व्हॅटिकन सिटी येथे पोप फ्रान्सिस यांची भेट घेण्यासाठी पोहचले. यासाठी ते पत्नी मेलानियासह रोममध्ये दाखल झाले. मात्र त्यावेळी यांच्यात अंतर्गत कलह दिसला. 
- रोममध्ये त्यांच्या स्वागतासाठी माध्यमांसह तेथील प्रमुख नेते उपस्थित होते. ट्रम्प-मेलानिया या जोडीने विमानातून बाहेर पडताच सर्वांना हात हालवून अभिवादन केले. 
- यानंतर ते दोघे विमानाच्या शिडीवरून खाली उतरू लागले. खाली उतरताना मेलानियांना ट्रम्प हात दिला मात्र मेलानियांनी ते पाहून न पाहिल्यासारखे केले. 
- त्यामुळे ड्रोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा एका एकदा जगासमोर फजिती झाली. ट्रम्प यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला खरा पण कॅमे-यातून तो थोडाच सुटणार होता.
 
फर्स्ट लेडी-राष्ट्राध्यक्ष यांच्यात सर्व काही आलबेल नाही?
 
- डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया यांच्यातील संबंध बिघडत चालले आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. 
- गेल्या महिन्यात एका कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी डोनाल्ड ट्रम्प मेलानिया यांच्याकडे पाहात असताना त्या स्मितहास्य करत आहेत आणि अचानक ट्रम्प यांनी पुढे पाहिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर बदलणारे नकारात्मक भाव एका व्हिडीओत टिपले गेले होते. 
- नंतर या व्हिडिओच्या टि्वटला मेलानिया यांनी लाईक केले होते. त्यामुळे ट्रम्प दांम्पत्यामध्ये सध्या सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, या घटनेचे फोटोज व व्हिडिओ....
बातम्या आणखी आहेत...