आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे मेलॅनी, स्वप्न नव्हे तर खरी-खुरी जलपरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्कॉटलंडच्या ओल्ड किलपॅट्रिक या गावातील 25 वर्षांची तरुणी. तिचे नाव मेलॅनी लॉंग असे आहे. ती कार्टून किंवा कथेतील जलपरीप्रमाणे खरे आयुष्‍य जगत आहे. लहानपणापासून डिस्नीतील सी प्रिसेन्स अरिएलला पाहून ती मोठी झाली.तिच्यासारखे होण्‍याची मेलॅनीची इच्छा होती आणि ती पूर्णही झाली आहे.
मेलॅनीला लहान जलपरी होण्‍याची इच्छा होती. तिच्या बालपणीचे स्वप्न आणि महत्त्वाकांक्षा थायलंडमधील फुकेटमध्‍ये आल्यानंतर पूर्ण झाले.येथे तिने पाच वर्षांपूर्वी प्रवास आणि डायव्हर म्हणून काम केले. विशेषत: मेलॅनीने स्कूबा डायव्हिंग इन्स्ट्रक्टरचे काम केले. हे करीत असताना तिचा थाई मुलांसाठी कार्य करणा-या धर्मदाय संस्थेशी संपर्क आला. या संस्थेला अशी मॉडेल हवी होती, की जी जलपरीप्रमाणे वेशभूषा करील. मेलॅनी आता जलपरी म्हणून काम करते. तिने लहानपणी पाहिलेले स्वप्न वास्तवात आले आहे. यासाठी तिने श्‍वासोच्छवासाचे तंत्र शिकून घेतले आहे. आता ती आपल्या ड्रीम जॉब करीत आहे.
सर्व छायाचित्र : सीपीएफ
पुढील स्लाइड्स पाहा जलपरी मेलॅनीची पाण्‍यातील जीवन....