आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटन फस्ट, ब्रिटन फस्ट ओरडत ब्रिटनच्या महिला MP वर झाडल्या गोळ्या, नंतर चाकूने केले वार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- ब्रिटनमध्ये विरोधी लेबर पार्टीच्या महिला खासदार जो कॉक्स (४१) यांची गुरुवारी हत्या करण्यात आली. उत्तर इंग्लंडमधील त्यांच्या मतदारसंघातील कार्यालयाजवळ त्यांच्यावर हल्ला झाला. त्यांना गोळी मारण्यात आली. त्याचबरोबर सुरीनेही वार करण्यात आला. जखमी कॉक्स यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

कॉक्स यांना दोन मुले आहेत. पुढल्या बुधवारी त्यांचा ४२ वा जन्मदिन होता. त्यांच्या हत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. हल्ल्यानंतर एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. पंतप्रधान डेव्हिड कॅमरून तसेच इतर खासदारांनी जनमतसंबंधी आयोजित सभा रद्द करून शोक व्यक्त केला. कॉक्स यांच्यावर हल्लेखोराने तीन गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक त्यांच्या डोक्यात घुसली. त्यानंतर त्यांच्यावर सुरीने वार केले. रक्तबंबाळ झालेल्या कॉक्स यांना हल्लेखोरांनी पायानेदेखील मारले. हल्ला करण्याअगोदर हल्लेखोरांनी ‘ब्रिटन फर्स्ट’ अशी घोषणा दिली होती.
पोलिस म्हणाले, अटकेतील आरोपीचे वय ५३ वर्षे आहे. त्याची लोनर टॉमी अशी आेळख आहे. त्याच्या घराची झडती घेतली जात आहे. हत्येमागील उद्देश शोधण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. टॉमी २० वर्षांपासून आत्मकेंद्री वागायचा, असे त्याच्या शेजाऱ्याने सांगितले. दरम्यान, कॉक्स समर्पित खासदार होत्या.

शांतपणे दाखल, कोणी रोखले नाही
कॉक्सयांनी काही लोकांच्या मदतीने एक बैठक घेतली होती. देशात २३ जून रोजी जनमताची पाहणी होणार आहे. ब्रिटनला युरोपियन संघटनेतून बाहेर ठेवावे, असे आग्रही मत त्यांनी मांडले होते. एका बैठकीला हल्लेखोर अतिशय शांतपणे दाखल झाला. त्याला कोणीही रोखले नाही.

तिला सुंदर विश्व हवे होते
>कॉक्सलासुंदरविश्व हवे होते. त्यासाठी ती पदोपदी संघर्ष करत होती. असे सुंदर जग निर्माण होईल यावर तिचा विश्वास होता.
-ब्रँडन, काॅक्सयांचे पती.

गरोदर महिलांसाठी कार्य
कॉक्स यांचे पती ब्रँडन हे माजी पंतप्रधान गार्डन ब्राऊन यांचे सल्लागार होते. ते सेव्ह चिल्ड्रनचे प्रमुखही होते. कॉक्स खासदार होण्याच्या अगोदर ब्राऊन यांची पत्नी सारा यांच्यासोबत गर्भवती महिलांची मदत करत होती.

पुढील स्लाइडमध्ये वाचा,
>> ब्रिटन फस्ट, ब्रिटन फस्ट असा ओरडत होता हल्लेखोर...
>> आणखी काय सांगितले प्रत्यक्षदर्शींनी....
>> हल्लेखोर पकडल्याचा फोटो
>> घटनेशी संबंधित आणखी फोटो...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)