2001 मध्ये अमेरिकेवर करण्यात आलेल्या 9/11 हल्ल्यात अल कायदाच्या 19 दहशतवाद्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटर, पँटॉगॉन आणि पेनिसिल्व्हेनियामध्ये एकाच वेळी मोठे दहशतवादी हल्ले घडवले होते. दहशतवाद्यांनी चार पॅसेंजर एअरक्राफ्टचे अपहरण केले होते. त्यापैकी दोन प्रवासी विमाने दहशतवाद्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या टॉवरमध्ये घुसवली. तर तिस-या विमानाने पेंटागॉनवर हल्ला केला. तर चौथे विमान पेनिसिल्व्हेनियामध्ये क्रॅश झाले. रविवारी अमेरिकेत LGBT क्लबमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्नभूमीवर आपण जाणून घेणार आहोत, या हल्ल्याबाबत.
या हल्ल्यामध्ये 400 पोलिस अधिकारी आणि फायर फायटर्ससह 2983 जणांचा मृत्यू झाला होता. हल्ल्यात मारल्या गेलेल्यांमध्ये 57 देशांच्या नागरिकांचा समावेश होता. अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनचा यामागे हात होता. हल्ल्याचा बदला घेत अमेरिकेने 2 मे 2011 रोजी पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये ओसामाचा खात्मा केला होता.
अमेरिकेसह जगभराला हादरवून सोडणाऱ्या या हल्ल्यानंतर अमेरिकेने सुरक्षा धोरणामध्ये काही महत्त्वाचे बदल केले होते. अमेरिकेत येणाऱ्या पर्यटकांवरही बारीक नजर ठेवण्यात येत होती. अनेक देशांमध्ये दिल्या जाणाऱ्या व्हिसामध्येही कपात करण्यात आली होती. त्याशिवायही अनेक उपाययोजना करत अमेरिकेने त्यानंतर पुन्हा दुसरा दहशतवादी हल्ला होऊ दिला नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा, 9/11 हल्ल्याचे काही निवडक PHOTOS
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.