आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Men And Women Flogged For Unmarried Relationship

लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, महिलेला खुलेआम चाबकाचे फटके

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंदा अकेह मशिदीबाहेर महिलेला चाबकाचे फटके लगावताना. - Divya Marathi
बंदा अकेह मशिदीबाहेर महिलेला चाबकाचे फटके लगावताना.
बंदा अकेह - गुडघ्यावर बसलेले ही महिला शिक्षा मिळण्याची वाट पाहत आहे. तिने लग्नापूर्वी एका पुरुषाबरोबर संबंध प्रस्थापित केले होते ही तिची चूक आहे. शरिया कायद्यांतर्गत महिलेला चाबकाचे फटके देण्याचे हे फोटो इंडोनेशियाच्या बंदा अकेह प्रांतातील आहे. फोटोमध्ये महिला पांढरे कपडे परिधान करून गुडघ्यावर बसलेले दिसते. तिला खुलेआम गर्दीसमोर चाबकाचे फटके मारले जात आहेत. जुम्मे की नमाजनंतर 3 महिला आणि 14 पुरुष आरोपींना शिक्षा देण्यात आली.
सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेल्या या देशामध्ये केवळ बंदा अकेह याठिकाणीच शरिया कायदे लागू करण्याची परवानगी आहे. सार्वजनिकरित्या चाबकाचे फटके मारणे ही याठिकाणी दिली जाणारी अगदी सामान्य शिक्षा आहे. मात्र महिलांना चाबकाचे फटके लगावण्याची शिक्षा तशी फारशी पाहायला मिळत नाही.

पुढील स्लाइड्सवर पाहा. चौकात सर्वांसमोर दिलेल्या या शिक्षेचे PHOTOS