आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO - वर्ल्ड रेकॉर्डः 164 स्काईडाइवर्सने 386 किमी/तासच्‍या गतीने उडी मारली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हीडिओ पाहण्यासाठी फोटोच्या मध्ये क्लिक करा - Divya Marathi
व्हीडिओ पाहण्यासाठी फोटोच्या मध्ये क्लिक करा
शिकागो – अमेरिकेच्‍या शिकागोमध्‍ये 164 स्काईडाइवर्सने आकाशातून प्रति तास 386 तासाच्‍या स्पीडने जमिनीकडे झेपावत जगातील सर्वांत मोठ्या व्‍हर्टिकल फॉर्मेशनचे रेकॉर्ड बनवले. डाइवर्सने या व्‍हर्टिकल फॉर्मेशनमध्‍ये आकाशात मोठ्या फुलाचा आकारही तयार केला. यापूर्वी वर्ष 2012 मध्‍ये 138 स्काईडाइवर्सने केलेला विश्‍वविक्रम त्‍यांनी मोडित काढला. यासाठी त्‍यांना 13 वेळ प्रयत्‍न करावे लागलेत. या नव्‍या वर्ल्ड रेकॉर्डचा व्‍हीडियोसुद्धा बनवला गेला आहे.
काही सेकंदात आले जमिनीवर
व्‍हीर्टिकल फॉर्मेशनच्‍या नंतर काहीच सेकंदात फॉर्मेशन तोड़त स्काईडाइवर्स पॅराशूटच्‍या मददने जमिनीवर आले. या क्षणाला पाहण्‍यासाठी लोकांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमाचे आयोजक रूक नेल्सन म्‍हणाले, तुमच्‍याकडे चांगली टीम असेल, चांगला सपोर्ट असेल तर या जगात काहीच अशक्‍य नाही, हे यातून सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया त्‍यांनी दिली.
19700 फुटावरून मारली उडी
नेल्सन यांनी सांगितले, टीममधील स्काईडाइवर्संना स्पेन, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका येथून निवडले गेले होते. सात एयरक्राफ्टच्‍या मददतीने स्काइडाइवर्सने 19700 फूट उंचावरून उडी मारली.यासाठी वेळ, जागा आणि एल्टीट्यूड यावर लक्ष ठेवणे गरजेचे होते.
उडी मारणे सोपे नाही
साधारणत: स्काईडाइवर्सची स्पीड 257 किमी प्रति तास असते. पण, या रेकॉर्डमध्‍ये 386 किमी प्रति तास स्‍पि‍डने ते खाली आलेत. यात धडक होण्‍याचा मोठा धोका असतो. शिवाय आकाशात असल्‍यानंतर प्राणवायू कमी असतो. त्‍यामुळे उडी मारणे सोपे नाही.
व्‍हीडियो पाहून निर्णय
फेडरेशन अयरोनॉटिक इंटरनेशनलच्‍या तीन जजनीं टीमचा व्‍हीडियो पाहिल्‍यानंतर नवा विश्‍वविक्रम झाल्‍याचे घोषित केले.
स्काईडाइव्हिंगचे PHOTOS पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा ...