आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समतेसाठी पुरुषांनी पुढाकार घ्यावा! संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस गटर्रेस यांचे मत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्र- जगाला नेतृत्व करण्यास सक्षम महिलांची गरज आहे. पुरुषांनी लिंग समतेसाठी पुढाकार घेणे आज काळाची गरज असल्याचे प्रतिपादन संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनिओ गटर्रेस  यांनी केले. महिला सक्षमीकरणासाठी व्यवस्थात्मक अडथळे अनंत असून ते पुरुषांनी पुढाकार घेतला तरच संपुष्टात येतील, असे अँटोनिओ म्हणाले. अधिकाधिक लोकांनी लिंग विषमेतविरुद्ध उभे राहणे गरजेचे आहे. यात पुरुषांवर अधिक जबाबदारी आहे. कमिशन ऑन स्टेटस ऑफ विमेन (सीएसडब्ल्यू) च्या वार्षिक सभेत बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.  सीएसडब्ल्यू ही जगातील महिला सक्षमीकरणासाठी काम करणारी सर्वोच्च संस्था आहे. विविध देशांच्या वरीष्ठ प्रतिनिधींचा यामध्ये समावेश आहे. 

शांती प्रक्रियेत महिलांची भूमिका महत्त्वाची
येत्या १५ वर्षांत शांतता प्रस्थापनेच्या प्रयत्नांमध्ये महिलांना सामील करून घेतल्यास  शाश्वत विकासाचा वेग ३५% वाढू शकतो. संयुक्त राष्ट्राच्या शांतिसेनेत केवळ ३% महिला असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. महिलांना अशा संधींचे द्वार खुले करावे, असे आवाहन त्यांनी शांती परिषदेला केले. २४ मार्चपासून सीएसडब्ल्यूची महिला आर्थिक सक्षमीकरण परिषद असून यात संधींविषयी चर्चा होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 

छळवणुकीचे माध्यम म्हणून इंटरनेट नको
न्यूयॉर्क-
सोशल मीडियाचा वापर वाढत असून इंटरनेटचा प्रसार वेगाने होत आहे. हे माध्यम महिलांच्या छळवणुकीसाठी सर्रास वापरले जात आहे अशी टीका भारतीय वंशाच्या वरिष्ठ अधिकारी लक्ष्मी पुरी यांनी केले. पुरी या संयुक्त राष्ट्राच्या महिला परिषदेवर उप कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. सायबर स्पेसमध्ये महिलांच्या प्रतिमा वाईट पद्धतीने वापरल्या जात आहेत. त्यांच्यावर पाळत ठेवली जाते. यामुळे धोका वाढल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...