आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफलातून सेवा: नोकरदार महिलांना रडवतील, हसवतील आणि तणावही दूर करतील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो- जपानमध्ये नोकरदार महिलांसाठी एक खास सर्व्हिस सुरु झाली आहे. महिलांमधील मानसिक तणाव दूर करण्यासाठी एक व्यक्तिने ही नवी सर्व्हिस सुरु केली आहे. तणावग्रस्त महिला क्षणात भावूक होऊन रडू लागतात. त्या घरी आहेत की ऑफिसात हे देखील पाहात नाही. अशाच महिलांसाठी ही सर्व्हिस आहे.

एका मेसेजवर खास शुभचिंतक तणावग्रस्त महिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचेल. तिचे अश्रु पुसून मनही हलके करेल. इतकेच नव्हे तर तिच्यात आत्मविश्वास जागवून निघून जाईल. विशेष म्हणजे कोणत्या शुभचिंतकाला बोलवायचे, याचे महिलांना पूर्ण स्वातंत्र्य असेल.
वाढता कामाचा ताणामुळे आज प्रत्येकजण त्रस्त आहे. परंतु, जपानी महिला जरा जास्तच त्रस्त दिसून आले आहे. कामाच्या ठिकाणी पुरुषांची जास्त संख्या, हे यामागील मुख्य कारण सांगितले जात आहे. कामाव्यतिरिक्त पुरुषांकडून होणार्‍या थट्टा-मस्करीचा महिलांना प्रचंड त्रास होत असतो. परिणामी महिला प्रचंड मानसिक तणावात असतात. त्यांच्या न्यूनगंडाची भावना निर्माण होते. तणावग्रस्त महिला नेहमी वरिष्ठांच्या टार्गेटवर असतात. त्यामुळे त्या खचतात व अश्रुंच्या रुपात दु:खाला मोकळी वाट मिळवून देतात. या संशोधनानंतर हीरोकी तेराई नामक एका व्यक्तिने ‘इकेमेसो’ सर्व्हिस सुरु केली आहे. याचा अर्थ असा की, ‘अश्रु पुसणारे हँडसम व सुंदर पुरुष’. हीरोकी यांनी याला 'क्राइंग थेरेपिस्ट' असेही संबोधले आहे.

दोन प्रकारचे तणाव दूर केले जातात...
पहिला - महिला जर आधीपासूनच रडत असेल तर क्राइंग थेरेपिस्ट तिच्याजवळ पोहोचेल. रेशमी रुमालाने तिचे अश्रु पुसेल. नंतर मधूर आवाजात ‍तिचे मन हलके करेल. तसेच इतर विषयांना हात घातून तिच्या मनावरील दडपण दूर करण्याचा प्रयत्न करेल. महिला सामान्य झाल्यानंतर तो निघून जाईल.

दुसरा- एखादी महिला आधीच तनावग्रस्त आहे. परंतु, तिला रडूही येत नसेल तर क्राइंग थेरेपिस्ट आधी तिला खूप भा‍वनिक व्हिडिओ क्लिप्स दाखवतील. व्हिडिओ पाहिल्यानंतर संबंधित महिलेला रडू कोसळते. तिचे मन हलके होते. थेरेपिस्ट महिले अश्रु पुसून तिचा आत्मविश्वास वाढवेल.

सर्व्हिस फीस 4500 रुपये (65 डॉलर)
महिलेकडून या सर्व्हिेसच्या बदल्यात 4500 रुपये (65 डॉलर) आकारले जातील. विशेष म्हणजे ‘इकेमेसो’ची ‍निवड करण्‍याचे स्वातंत्र्य महिलांना देण्यात आले आहे. त्यांच्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध असतील. ‘छोट्या भावासारखा दिसणारा, इंटेलीजेंट, ‘थोडा वयस्कर व रोमांटिक ‍दिसणारा असे सात पर्याय उपलब्ध राहातील. ही सर्व्हिस फक्त नोकरदार महिलांसाठी असेल. तसेच तिच्या कार्यालयातचही सर्व्हिस दिली जाईल. ‍हिरोकीने सांगितले की, काही दिवसांपूर्वी वेबसाइट लॉन्च केली आहे.