आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकन सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या सरन्‍यायाधीशपदी मेरिक बी गारलँड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकन राष्ट्रपती बराक ओबामा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी मेरिक बी गारलँड यांची नियुक्ती केली आहे. या पदासाठी भारतवंशीय श्री. श्रीनिवासन यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. अंतिम तिघांमध्ये त्यांचा समावेश होता. परंतु अखेरच्या क्षणी त्यांचे नाव मागे पडले. सिनेटच्या मंजुरीनंतर ६३ वर्षीय गारलँड हे पद सांभाळतील. त्यांच्या नावाला रिपब्लिकन पक्षानेही पाठिंबा दिला.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अँटोनिन स्कालिया यांचे गेल्या महिन्यात निधन झाल्याने हे पद रिक्त झाले होते. गारलँड सध्या यूएस कोर्ट ऑफ अपील्स फॉर द डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया सर्किटचे मुख्य न्यायाधीश आहेत.
बातम्या आणखी आहेत...