आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर ट्रेंड करतोय #MeToo, लोक शेअर करत आहेत लैगिक शोषणाचे प्रसंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियावर # च्या माध्यामातून लोक काही महत्वाच्या गोष्टी शेअर करत असतात. जर ती गोष्ट अनेक लोकांनी फॉलो केली, तर तिला ट्रेंडिंग समजले जाते. सध्या सोशल मीडियावर #MeToo ट्रेंड करत आहे.

काय आहे #MeToo...
ट्वीटरपासून ते फेसबुकपर्यंत, सर्वत्र हे ट्रेंड करत आहे. #MeTooच्या माध्यमातून लोक आपल्यासोबत झालेल्या त्या घटनांचा उल्लेख करत आहेत, ज्या आजपर्यंत त्यांनी कोणासोबतच शेअर केला नाही. लैगिक शोषणाशी संबंधीत या घटनांना आजपर्यंत त्यानी स्वत:पर्यंतच ठेवले होते. परंतु, सोशल साइट्सवर नवा ट्रेंड सुरू झाला, तर सर्वांनी या विरोधात आवाज उठवायला सुरूवात केली आहे. जगभरातील लोकांसह भारतीय लोक ही या ट्रेंडला फॉलो करून आपल्यासोबत झालेल्या लैगिंक शोषणाचे प्रसंग शेअर करत आहेत. या ट्रेंडला फॉलो करणाऱ्यांमध्ये केवळ महिलाच नाही, तर अनेक पुरूषांनी देखील आपल्या टाइमलाइनवर याला शेअर केले आहेत.

कसे सुरू झाले  #MeToo?
प्रसिद्ध अभिनेत्री एलिसा मिलानोने सर्वात आधी हे हॅशटॅग ट्विट केले, असे सांगण्यात येत आहे. या ट्रेंडची सुरूवात अमेरिकर फिल्म प्रोड्यूसर हार्वे विंस्टन स्कॅन्डलनंतर झाली. अनेक महिलांनी विंस्टनवर सेक्शुअल असॉल्टचा आरोप लावला आहे. या घटनेनंतर विंस्टनच्या पत्नीने त्याला सोडून दिले. आपली नोकरी गेल्यानंतर विंस्टनला अनेक मेंबरशीप गमवाव्या लागल्या. यानंतर जगभरातील अनेक महिलांनी आपल्यासोबत झालेले लैंगिक शोषनाचे प्रसंग #MeToo च्या माध्यमातून शेअर केले आहेत.

पुढील स्लाइडवर वाचा लोकांनी केलेले ट्विट्स...
बातम्या आणखी आहेत...