आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात धोकादायक ड्रग माफिया अटकेत, सहा महिन्‍यांपूर्वी पळाला होता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस मॉचिस - सहा महिन्‍यांपूर्वी मॅक्सिकोच्‍या जेलमधून फरार झालेला ड्रग माफिया जोआक्विन अॅल चापो गूजमॅन याला पुन्‍हा पकडल्‍याची माहिती मॅक्सिकोचे राष्‍ट्रपती पॅना नेटो यांनी स्‍वत: ट्वीट करून दिली. अॅल चापो गूजमॅन हा जगातील सर्वात मोठा आणि धोकादायक ड्रग माफिया आहे. त्‍याला तिसऱ्यांदा अटक करण्‍यात आली.
कशी केली अटक
- मॅक्सिकन नेव्‍हीने अॅल चापोला पकडण्‍यासाठी गुप्‍त मोहीम आखली होती.
- नेव्‍हीच्‍या माहितीनुसार, लॉस मॉचिसमधील एका घरात काही संशयित व्‍यक्‍ती राहत असल्‍याची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिली.
- त्‍या आधारे नेव्‍हीने छापा मारला असता घरातून त्‍यांच्‍यावर गोळीबार झाला.
- नेव्‍हीने त्‍याली प्रत्‍त्‍युतर दिले. यामध्‍ये पाच संशयित ठार झाले.
- यामध्‍ये घरातून अॅल चापोसह सहा लोकांना अटक केली.
- अटक झालेल्‍यांमध्‍ये त्‍याचा उजवा हात समजला जाणारा व्‍यक्‍तीही आहे.
- अॅल चापोने गटारीच्‍या माध्‍यमातून पळून जाण्‍याचा बेत आखला होता.
पुढे वाचा, सर्वात सुरक्षित जेलमधून पळाला