आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेक्सिकोमध्ये सत्तेसाठी मोफत वाटले १ कोटी डिजिटल टीव्ही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Debate Placeholder
ज्यांनी देशाच्या संपत्तीचा दुरुपयोग करून कमाई केली त्यांना आमचा विरोध आहे.
मेक्सिकोची अर्थव्यवस्था तितकीशी चांगली नाही. तरीही लोकांना अपेक्षा आहे की त्यांची स्वप्ने साकार करणारे सरकार सत्तेवर येईल. ज्यांनी देशावर सात दशकांपर्यंत सत्ता गाजवली ते नेते व पक्षांना तेथील जनता कंटाळली आहे. आज हेच पक्ष येनकेनप्रकारे पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी लोकांना डिजिटल टीव्ही वाटत आहेत.
Âएलिझाबेथ मल्किन, राजकीय प्रकरणांच्या तज्ज्ञ
अमेरिकेचा शेजारी देश मेक्सिकोमध्ये मध्यावधी निवडणुका झाल्या. जनतेने ४८ वर्षीय राष्ट्रपती एनरिक पेना नईतो यांच्यावर विश्वास दर्शवण्यासाठी मतदान केले. डिसेंबर २०१२ मध्ये त्यांचा राष्ट्रपतिपदाचा कार्यकाळ सुरू झाला होता. त्यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाल्याने मध्यावधी निवडणुकांची पाळी आली. ते याआधी मेक्सिको राज्याचे गव्हर्नर होते. पेना नईतो इन्स्टिटुयूशनल रिव्हॉल्युशनरी पार्टीचे (पीआरआय) नेता आहेत. या पक्षाने सुमारे सात दशके शासन केले. निवडणुकीत या पक्षाची प्रतिष्ठा पणााला लागली असून हा पक्ष लोकांना भुलवण्यासाठी वेगवेगळी आमिषे दाखवत आहे.
पीआरआयने या वेळी नवा हातखंडा वापरत एक कोटी लोकांना मोफत डिजिटल टीव्ही वाटण्यास सुरुवात केली आहे. या पक्षाचे अधिकारी गेल्या काही दिवसांपासून २४ इंची डिजिटल टीव्ही वाटत आहेत. त्यासाठी असे स्पष्टीकरण दिले जात आहे की, सरकार गरीब जनतेला डिजिटल तंत्रज्ञानाने जोडत आहे. वास्तवात लोकांची मते खरेदी करण्याचाच तो प्रयत्न आहे. केवळ टीव्हीच नव्हे तर इतर घरगुती उपकरणेही वाटली जात आहेत. विरोधी पक्षांनी पेना नईतोंच्या सरकारच्या या योजनेवर लोकांची मते खरेदी करण्याची जुनी खेळी असल्याची टीका केली आहे. इतर पक्ष, नेत्यांच्या रॅलीमतही भेटवस्तू वाटल्या जात आहेत. गेल्या तीन महिन्यांत ८० लाखांपेक्षा जास्त टीव्ही सेट व इतर उपकरणे वाटली गेली आहेत. अन्य सामग्रीत टी शर्ट, बेसबॉल कॅप, फूड पॅकेट, शालेय साहित्य, घरावर ठेवण्याच्या पाण्याच्या टाक्या आदी वस्तूंचा समावेश आहे.
डी मोरेलोस सिटीमध्ये इसाबेल रॉड्रिग्ज पीआरआयच्या कार्यालयासमोर रांगेत उभी होती. तिने एक टीव्ही स्वत:साठी व दुसरा आईसाठी आणला आहे. ७० हजारांवर कुटुंबे अशी आहेत की ज्यांच्या घरी दोन-दाेन टीव्ही आले आहेत. पीआरआयचा सहकारी पक्ष ग्रीन पार्टी चित्रपटांची तिकिटे वापरत आहे. या वाटप खेळात विरोधी पक्षांनी सरकारवर सत्तेचा दुरुपयोग करण्याचा आरोप केला आहे. अनेक राज्यांतील लोक विरोधकंाशी सहमत आहेत. मेक्सिको राज्यातील कर्मचारी वर्ग सरकारच्या पूर्णपणे विरोधात आहे.
४१ वर्षीय मारिया कार्वाजल सांगतात, सात दशकांपासून शासन करत असलेल्या पीआरआयला जनतेने २००० मध्ये हरवले होते. २०१२ मध्ये तो पक्ष पुन्हा सत्तेत आला. प्रत्येक निवडणुकीत पैसे वाटून मते विकत घेतो. राजकीय पक्षांनी अशा वस्तू वाटून लोकांना खरेदी करावे, याच्याशी मी सहमत नाही. ही मोठी निवडणूक आहे. यात ५०० खासदार, एक तृतीयांश राज्यांचे गव्हर्नर, निम्म्या राज्यांचे मेयर व आमदार निवडून दिले जाणार आहेत. निवडणूकपूर्व सर्वेक्षणात पेना नईतो यांचा पराभव होणार असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. देशातील अर्धी जनता त्यांच्याविरोधात आहे. त्यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराच्या दलदलीत फसल्याचा व गुन्हेगारांशी हातमिळवणी केल्याचा आरोप आहे. मतदान संस्था पॅरोमेट्रियाचे संचालक फ्रान्सिस्को अबिन्दिस सांगतात की हिंसा व कमकुवत अर्थव्यवस्थेमुळे लोकांच्या हे लक्षात आले आहे की, देश चुकीच्या मार्गाने जात आहे. पाच उमेदवार मारले गेले आहेत. शिक्षक वर्गही सरकारमधील भ्रष्टाचारावर नाराज आहे. ते आंदोलन करत आहेत.
© The New York Times