आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षभरानंतर समोर आला MH17 विमान अपघाताशी संबंधित VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनेशनल डेस्क - 17 जुलै 2014 रोजी क्रॅश झालेल्या मलेशियाच्या MH17 विमान अपघाताशी संबधित एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात रशिया समर्थक बंडखोर अपघातस्थळी आढळून आल आहेत. विशेष म्हणजे हे सर्व प्रवाशांच्या सामानाची लुटालूट करत असल्याचेही या व्हिडिओत दिसते. चार मिनिट 12 सेकंदाचा हा व्हिडिओ न्यूज कॉर्प ऑस्ट्रेलियाने जारी केला आहे. मात्र, या व्हिडिओला अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही.

काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हिडिओची सुरुवात आग लागलेली असलेल्या एका ढिगाऱ्याजवळ झालेली दाखवण्यात आले आहे. त्यानंतर लष्कराच्या गणवेशातील एक व्यक्ती पाठीवर बॅग घेऊन त्याठिकाणी आढळतो. त्याचवेळी मागच्या बाजुनेही रशियन भाषेत काही लोकांचा आवाजही येतो. व्हिडिओमध्ये याचे इंग्रजी भाषांतरही करण्यात आले आहे.

हा व्यक्ती फोनवर कोणाशी तरी बोलत आहे. तो समोरचा व्यक्ती त्याला विचारतो, की त्याठिकाणी एखादे विमान आहे का? त्यानंतर त्या परिसरात कोणालाही फिरू न देण्याचे निर्देश मिळतात. त्यानंतर अपघातस्थळी आणखी तीन लोक असल्याचे दिसते.

न्यूज कॉर्प ऑस्ट्रेलियाच्या दाव्यानुसार क्रॅश साइटवर असलेले सर्व लोक रशियन समर्थक बंडखोर आहेत. हा व्हिडिओ त्यांनीच शूट केला आहे. मात्र व्हिडिओची सत्यता पडताळणी अद्याप झालेली नाही. मात्र सीएनएनच्या रिपोर्टनुसार याबाबत अऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे.

उत्तर यूक्रेनच्या हवाई हद्दीतून जात असताना रशियन समर्थक बंडखोरांनी विमान मिसाईलने उडवले होते. या हल्ल्यात विमानातील सर्व 298 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. युक्रेनचे राष्ट्रपती पेट्रो पोरोशेंको म्हणाले की, ते हे विमान पाडणाऱ्या दोषींना शिक्षासुनावत मृतांना न्याय मिळवून देतील.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...