आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Migrant Boat With 650 On Board Capsizes Near Libyan Waters

लिबिया ; भूमध्य सागरात जहाज बुडाले 700 प्रवाशांना जलसमाधीची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्रिपोली - लीबियाच्या समुद्र किनाऱ्याजवळ भूमध्य सागरात एक प्रवासी जहाज बुडाले. यात 700 प्रवासी असण्याची शंका व्यक्त केली जात आहे. आताप्रयंत मिळालेल्या माहितीनुसार, 28 जणांना वाचवण्यात यश आले आहे. अजूनही बचाव कार्य सुरु आहे. भूमध्य सागरातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी दुर्घटना समजली जात आहे.

ही दर्घटना इटलीच्या लम्पेदुसा द्विपाच्या जवळपास 180 किलोमीटर दूर रात्री घडली आहे. असे सांगितले जात आहे, की जहाजावरील सर्व प्रवासी एका ठिकाणी जमा झाल्यानंतर जहाज बडायला लागले. माल्टाचे पंतप्रधान जोसफ मस्कट यांनी ट्वीट करुन 650 प्रवासी बुडाल्याचे म्हटले आहे. त्यासोबत त्यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच, संयुक्त राष्ट्र उच्चायुक्ताच्या प्रवक्त्या कार्लोटा सामी यांनी स्थानिक वृत्तवाहिनीला सांगितले, की आम्हाला भीती आहे, की ही दुर्घटना फार मोठी आहे. त्यामुळे यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे.
विशेषम्हणजे. याच आठवड्यात लिबियाहून इटलीला जाणारे एक प्रवासी जहाज बुडाले त्यात 400 लोकांचा मृत्यू झाला होता.
फोटो - इटलीच्या सिसिली पोर्टो एम्पेडॉक्ल बंदरावर आणण्यात आलेले प्रवासी. हे छायाचित्र 13 एप्रिलचे आहे