आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाॅम्ब निकामी करण्यासाठी शहराचे वारंवार स्थलांतर; जर्मनीतील 50 हजारांवर लोक पीडित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हनोव्हर- दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम अनेक पिढ्यांना बसला आहे. जर्मनीतील हनोव्हर शहराला एवढ्या वर्षांनंतरही सोसावा लागला आहे. महायुद्ध काळातील काही बाॅम्ब शहरात आढळून आला. त्याला निकामी करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा कामाला लागली. काही तासांत लोकांना आपली घरेदारे, व्यवसाय सोडून सुमारे ५० हजारांवर लोक सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाले होते. यापूर्वीही चारवेळा शहराने स्थलांतराची झळ अनुभवली आहे.   

जर्मनीतील ही अशा प्रकारची दुसरी महाशोधमोहीम ठरली. त्याचा परिणाम शहरातील पन्नास हजारांहून अधिक नागरिकांवर पडला. महायुद्धाच्या काळात डागलेल्या काही बाॅम्बपैकी पाच बाॅम्ब हनोव्हर शहरात आढळून आले आहेत. ते जिवंत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणेने शिताफीने कारवाईला सुरुवात केली. 

श्वानपथकाच्या मदतीने शहरातील अन्य भागांतही अशा प्रकारच्या जिवंत बाॅम्बचा शोध सुरू झाला. जिवंत बाॅम्ब असल्याने नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित होण्याचे आदेश प्रशासनाने बजावले. त्यानंतर अनेक इमारती रिकाम्या करण्यात आल्या. त्यांच्यासाठी तातडीने तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करून देण्याचे काम रविवारी देखील युद्धपातळीवर सुरू होते. 

सायंकाळपर्यंत पीडित आपल्या घरी पुन्हा परततील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. जून २०१०, डिसेंबर २०११, २०१२, २०१५ मध्ये बाॅम्ब सापडल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपातील स्थलांतर झाले होते.  हनोव्हर शहरात गेल्या वर्षी नाताळ दरम्यान १.८ टन वजनी बाॅम्ब सापडला होता. तेव्हाही प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५४ हजारांेचे तात्पुरते स्थलांतरित झाले होते. 

तीन बाॅम्ब निकामी  
बाॅम्ब निकामी पथकाला शहरात १३ संशयित स्फोटक वस्तू आढळून आल्या. त्यात पाच बाॅम्ब असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पैकी तीन निकामी करण्यात आले.  

२ लाख ५० हजारांवर मृत्यू  
९ ऑक्टोबर १९४३ ची काळरात्र. दुसरे महायुद्ध सुरू असताना हनोव्हरच्या आकाशातून बाॅम्बवर्षाव झाला आणि त्यात २ लाख ५० हजारांवर लोकांना आपले प्राण गमवावे लागले. २ लाखांहून अधिक नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली होती. बाॅम्बचा हा इतिहास हनोव्हरचे नागरिक अद्यापही विसरलेले नाहीत. मात्र बाॅम्बने त्यांची झोप उडवली.  
बातम्या आणखी आहेत...