आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Militants Kill 147 At Garissa University In Kenya

मदरशातील शिक्षक आहे केनिया हल्ल्याचा मास्टर माइंड, 147 विद्यार्थ्यांना मारले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नैरोबी - उत्तर-पूर्व केनियातील गेरिशा विद्यापीठात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात फक्त ख्रिश्चन विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात आले. हल्ल्या दरम्यान अल शबाब या इस्लामिक दहशतवादी संघटनेने वसतिगृहात झोपलेल्या विद्यार्थ्यांना उठवले आणि जे लपून बसले होते त्यांना शोधून बाहेर काढले. त्यानंतर मुस्लिम विद्यार्थ्यांना सोडून देण्यात आले आणि फक्त ख्रिश्चन विद्यार्थ्यांना निशाणा बनवण्यात आले. दहशतवाद्यांकडे एके-47 सारखे अत्याधूनिक शस्त्र होते. या हल्ल्यात 147 विद्यार्थ्यांना ठार करण्यात आले तर 80 विद्यार्थी जखमी झाले. 13 तास चाललेल्या लष्कर आणि पोलिसांच्या कारवाईत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी या हल्ल्याचा मास्टरमाइंड कोण आहे त्याचा शोध लावला आहे. त्याचे नाव मोहम्मद महमूद असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच्यावर याआधीपासून दोन लाख 20 हजार डॉलरचे बक्षिस जाहीर करण्यात आलेले आहे. मोहम्मदला आणखी काही नावाने ओळखले जाते. तो एका मदरशात शिक्षक होता. त्याने याआधी केनियातच एका बसवर हल्ला केला होता. त्यात 28 जणांचा प्राण गेला होता.

आम्ही 'अल-शबाब' कडून आलो, दहशतवाद्यांनी दिल्या घोषणा
हल्ल्या दरम्यान दहशतवाद्यांनी आम्ही 'अल शबाब'कडून आलो असल्याच्या घोषणा दिल्या. एका विद्यार्थ्याने सांगितले, पहाटे 5.30 वाजता हल्ला झाला. तेव्हा विद्यापीठातील एक मशिदीत काही लोक नमाज पठण करत होते. दहशतवादी तिकडे वळले नाहीत त्यांनी फक्त ख्रिश्चन विद्यार्थ्यांना निशाणा बनवले. पोलिस प्रमुख जोसेफ बोएनट यांनी सांगितले, की विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर ग्रेनेड हल्ला केल्यानंतर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. विद्यापीठ वसतिगृहातील 815 विद्यार्थ्यांपैकी 500 विद्यार्थ्यांना सुरक्षीत बाहेर काढण्यात आले आहे. हल्ल्यानंतर गेरिशाच्या जवळील वजीर, ताना रिव्हर आणि मानडेरा भागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. ज्या भागात हल्ला करण्यात आला आहे, तो सोमालिया सीमेपासून 145 किलोमीटर अंतरावर आहे. हल्ल्यात सहभागी एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे.

1998 नंतरचा सर्वात मोठा हल्ला
केनियाचे गृहमंत्री जोसेफ कॅसिरी म्हणाले, की हल्ल्यात लष्कराचे काही जवान देखील जखमी झाले आहेत. केनियात 1998 मध्ये अमेरिकी दुतावासावर हल्ला झाला होता, त्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. केनियाने सोमालियात लष्कर पाठवल्यामुळे अल शबाब संघटना नाराज झाली होती, त्यामुळेच हा हल्ला झाला आहे. गेरिशा विद्यापीठ सोमालियाला लागून असलेल्या अशांत सीमा भागात आहे. अल कायदाशी संबंधीत अल शबाबचा प्रवक्त शेख अली मोहम्मद रेज याने हल्ल्याची जबाबदारी घेत, असेच हल्ले सुरु राहातिल असे म्हटले आहे. या संघटनेने याआधी 2013 मध्ये केनियातील वेस्टगेट शॉपिंग मॉलमध्ये हल्ला केला होता.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, हल्ल्याने भयग्रस्त झालेले विद्यार्थी आणि पोलिस कारवाई