आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सौदीच्या सीमेवर लष्कराचे हल्ले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियाध - येमेनचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्देराब्बो मन्सूर हादी यांच्या समर्थक लष्कराने सौदी अरेबियाच्या सीमेवर हौथी बंडखोरांना लक्ष्य करण्यासाठी केलेल्या हल्ल्यात १२ हून अधिक जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे येमेन बंडखोरांनी डागलेल्या रासायनिक शस्त्रांचा पाडाव करण्यात आल्याचा दावा सौदीकडून करण्यात आला आहे.

जाझन आणि नाजरान भागातील बंडखोरांच्या अनेक तळांवर हादी यांच्या समर्थक लष्कराने हल्ले चढवले. सौदी लष्करानेही कारवाईत सहभाग घेतला होता. हादी समर्थक आणि सौदी हवाई दल यांची संयुक्त कारवाई २६ मार्चपासून सुरू आहे. त्यात हौथींच्या अनेक तळांना लक्ष्य करण्यात आले आहे. त्याअगोदर एप्रिलमध्ये बंडखोरांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात सौदीच्या तीन जवानांचा मृत्यू झाला होता. सौदी अरेबियातील महत्त्वाचे शहर असलेल्या खामिस मुशैत शहराला लक्ष्य करण्यासाठी हौथी बंडखोरांनी शनिवारी दोन रासायनिक
क्षेपणास्त्रे डागली होती. पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास दोन हल्ले करण्यात आले होते.परंतु सौदीलष्कराने ही क्षेपणास्त्रे हाणून पाडली, असा दावा सौदी सरकारकडून करण्यात आला आहे.