आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुर्की : लोकशाहीच्या रक्षणासाठी अर्ध्या रात्री जनतेचे लाेंढे रस्त्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुर्कस्तानातील लष्करी बंड जनतेने उधळून लावला आहे. अनेक इमारतींमध्ये घुसून बसलेल्या जवानांना लोकांनी ओढत बाहेर काढले. - Divya Marathi
तुर्कस्तानातील लष्करी बंड जनतेने उधळून लावला आहे. अनेक इमारतींमध्ये घुसून बसलेल्या जवानांना लोकांनी ओढत बाहेर काढले.
अंकारा - नाटोचा सदस्य असलेल्या तुर्कीमध्ये लष्कराच्या एका गटाने शुक्रवारी रातोरात बंड करून सत्ता पालटण्याचा प्रयत्न केला. राजधानी अंकारा आणि इस्तंबूलच्या रस्त्यांवर रणगाडे आणि चिलखती गाड्या तैनात झाल्या होत्या. हेलिकॉप्टरद्वारे हल्ले होत होते. एफ- १६ लढाऊ विमानेही शहरांवर घिरट्या घालत होती. दोन्ही शहरांत रात्रभर धमाक्यांचे आवाज ऐकू येत होते. संसदेवर बॉम्बहल्ला करण्यात आला. तुर्कीच्या सरकारी टीव्हीच्या कार्यालयावरही ताबा घेण्यात आला. विमानतळ बंद करून आंतरराष्ट्रीय उड्डाणेही रद्द केली गेली. बंडखोरांनी ‘पीस काैन्सिल’च्या नियंत्रणाखाली मार्शल लॉ लागू झाल्याचा दावा केला.
परंतु तुर्कीचे राष्ट्रपती रेचप तैयप एर्दोगन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लोकशाही वाचवण्यासाठी संचारबंदी झुगारून तुर्की जनता अर्ध्या रात्री रस्त्यावर उतरली. जनतेच्या सामर्थ्यापुढे अवघ्या पाच तासांतच बंडखोरांनी नांग्या टाकल्या. जनतेने रेटा लावून एवढ्या कमी वेळेत लष्करी बंडाचा कट उधळून लावण्याचे हे ऐतिहासिक उदाहरण आहे. एर्दोगन यांचे विश्वासू लष्कर आणि पोलिसांनीही बंडखोरांना चिरडून टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यादरम्यान मोठ्या प्रमाणावर झालेल्या रक्तपातात २५० लोक मारले गेले. १००० हून अधिक जण जखमी झाले.
लष्कराच्या काही वरिष्ठ कमांडर्ससह २८३९ पेक्षाही अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. ९० टक्के परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा सरकारने केला आहे. गोंधळाच्या प्रारंभीच्या काही तासांनंतर भल्या पहाटे इस्तंबूलला पोहोचलेल्या एर्दोगन यांनी देशावर आपलेच नियंत्रण असल्याची घोषणा केली. तख्त पालटवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी गंभीर परिणाम भोगायला तयार रहावे, असा इशारा त्यांनी दिला. बंडखोरांना मृत्युदंडाची शिक्षा दिली जाण्याची चर्चा आहे. शनिवारी रात्रीही जनतेने रस्त्यांवरच रेटा देऊन रहावे असे आवाहन एर्दोगन यांनी केले आहे.
लोकशाही व शांततेसाठी जागे व्हा !
तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगन यांनी टीव्ही, ट्विटर आणि बल्क एसएमएसद्वारे लोकांना ‘लोकशाही आणि शांततेसाठी जागे व्हा !’ असे आवाहन केले. या आवाहनावर हजारो तुर्क रस्त्यावर उतरले. शुक्रवारी रात्री रस्ते आणि मुख्य चौकात उभे असलेले रणगाडे आणि चिलखती गाड्यांवर लोक धावून गेले. लष्कराने लोकांवर बेछूट गोळीबार केला तरीही ते बधले नाहीत.
गुलेनवर कटाचा संशय
या लष्करी बंडामागे अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या मुल्ला फतुल्ल गुलेनचा हात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र तुर्कीचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक शक्तिशाली व्यक्ती असलेल्या गुलेनने हा आरोप फेटाळला आहे. इस्लामी धर्मगुरू गुलेनचे तुर्कीमध्ये लाखो अनुयायी आहेत. दीडशेहून अधिक देशांत त्याच्या शाळा आहेत. अब्जावधी डॉलरचा त्याचा कारभार आहे. तो अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनियात राहत आहे. गुलेन समर्थक तुर्कीचे युद्धखोर आहेत. मुल्ला गुलेन न्यायपालिका, शिक्षण व्यवस्था मीडिया आणि लष्करात आपला गट बनवून सत्ता पालटू पाहत आहे, असे तुर्कीने म्हटले आहे.
परदेशात टीका, मुस्लिम जीव द्यायला तयार
एर्दोगन यांना मुस्लिम समुदायाचे व्यापक समर्थन आहे. मात्र बळाच्या जोरावर विरोधकांचा आवाज दडपण्यामुळे एर्दोगन यांच्यावर परदेशात टीका होत आली आहे. टीकाकार तुर्क पत्रकारांवर खटले भरले जातात आणि परदेशी नागरिकांना देशाबाहेर हाकलले जाते. ६१ वर्षीय एर्दोगन २००२ मध्ये सत्तारूढ झाले होते. २०१४ मध्ये थेट निवडणुकीद्वारे अध्यक्ष बनण्याआगोदर ते ११ वर्षे पंतप्रधान होते. बालपणी पैसे कमावण्यासाठी एर्दोगन इस्तंबूलच्या रस्त्यावर लिंबूपाणी आणि बन विकत होते.
पुढील स्लाइडमध्ये,
> 10 पॉइंटमध्ये समजून घ्या तुर्कस्थानात आतापर्यंत काय-काय झाले
> पाहा, तुर्कस्थानमधील शुक्रवार रात्रीची परिस्थिती
> 147 भारतीय विद्यार्थी अडकले, सर्व सुरक्षित

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...