आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झुमांनी राजीनामा द्यावा; तीन मंत्र्यांनी केली मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी केली असल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी सोमवारी दिले. त्यामुळे २००९ मध्ये सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच झुमा यांच्या नेतृत्वाला गंभीर आव्हान मिळाले आहे.
द न्यूज २४ न्यूज एजन्सीने सत्ताधारी आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या सूत्रांचा हवाला देऊन म्हटले आहे की, पर्यटनमंत्री डेरेक हॅनेकोम, आरोग्यमंत्री आरोन मोत्सोलेदी आणि सार्वजनिक कामकाजमंत्री थुलास न्क्षेसी यांनी झुमा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आठवडाअखेर झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली. त्यामुळे बैठक सोमवारपर्यंत वाढवावी लागली. झुमा यांच्या नेतृत्वावर याआधीच मोठी टीका होत होती. अलीकडच्या काळात पक्षाचे कार्यकर्ते, कामगार संघटना, नागरी गट आणि उद्योगविश्वातील नेत्यांनीही झुमा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आता भ्रष्टाचाराची चौकशी करणाऱ्या समितीने त्यांच्यावर गैरवर्तणुकीचे नवे आरोप ठेवल्याने ते चांगलेच दबावात आहेत. असे असले तरी झुमा यांचे पक्षात अनेक कट्टर समर्थक आहेत. १० नोव्हेंबरला संसदेतील अविश्वास ठराव खासदारांनीही फेटाळून लावला आहे.

राजकीय विश्लेषक रंजेनी मुनुस्वामी यांनी डेली मॅव्हेरिकच्या संकेतस्थळावर लिहिले आहे की, ‘झुमा हे आपल्या राजकीय कारकीर्दीतील सर्वात मोठ्या आव्हानाला तोंड देत आहेत यात शंका नाही. आफ्रिकन नॅशनल काँग्रेस आणि आघाडीतील अनेक जणांना ते अध्यक्षपदी नको आहेत.’
बातम्या आणखी आहेत...