आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: रशियातील या खाणीतून दरवर्षी निघत होते 2 हजार किलोचे हिरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - फोटोत दिसत असलेले हे सायबेरियन क्रेटर नाही, तर रशियाच्या पूर्वकडे असलेल्या सायबेरियातील मिर्निची जुनी हिर्‍याची खाण आहे. 2011 मध्ये सुरक्षेच्या कारणांमुळे या खाणीला बंद करण्यात आले. त्यावेळी या खाणीची खोली 525 मीटर आणि रुंदी 1,200 मीटर एवढी होती. बिंघम कॅनियन खाणीनंतर 'मिर' ही जगातील दुसरी सर्वात मोठी खाण आहे.
मिळालेल्या अहवालानुसार, खाणीच्या वरून जाणार्‍या अनेक हेलिकॉप्टरचे अपघात झाले आहेत. यामुळे ही खाण बंद करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्यामते हा खड्डा एवढा मोठा आहे की, आतल्या बाजूस जाणारी हवा वर उडत असलेल्या हेलिकॉप्टर्सना खाली ओढत असल्याने हे अपघात होतात असे सांगितले आहे. 13 जून 1955 मध्ये सोव्हिएत भूशास्त्रज्ञन युरी खैबरदिन यांनी या खाणीचा शोध लावला होता. रशीयात अशा प्रकारचे हे पहिले संशोधन होते. यामुळे 1957 मध्ये युरी यांना लेनिन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, हा पुरस्कार सोव्हिएत संघाचा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो.

या खाणीची सुरुवात 1957 च्या कडाक्याच्या थंडीत करण्यात आली होती. सायबेरियामध्ये वर्षातील सात महिने कडाक्याची थंडीच असते. अशा वातावरणात जमीन एकदम कडक होते. त्यामुळे कर्मचार्‍यांना ही जमीन खोदणे म्हणजे लोखंदाचे दाणे चावण्यासारखेच होते. येथे कर्मचारी जेट इंजिनच्या मदतीने हिरे बाहेर काढत. कधी कधी डायनामाईटचाही वापर करण्यात येत असे. या खाणीतून 44 वर्षांपर्यंत हिरे काढण्यात आले. या खाणीचे काम जेव्हा सर्वोच्च शिखरावर होते, तेव्हा येथून दरवर्षी एक कोटी कॅरेट (2,000 किलो) हिरे काढले जात. या खाणीतून 3,600 लोकांचा उदरनिर्वाह होत होता.

थंडीच्या काळात येत असे मोठी अडचण
ही खाण ज्या भागात होती, तेथे हिवाळ्यात वातावरण एवढे थंड असायचे की, कर्मचारी ज्या वाहनांनी खाणीमध्ये उतरत, त्या वाहनांचे पेट्रोल गोठून जात असे. तर खाणीमध्ये मशिनही बर्मामुळे गोठून जात. यामुळे संपूर्ण खड्ड्याला झाकून काम करावे लागत असे.

पुढील स्लाईडवर पाहा, रशियाच्या या मिर हिरा खाणीचे PHOTOS