आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

70 वर्षांपूर्वी लुटलेला खजिना सापडला, किंमत हजारो कोटींमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - जर्मनीच्या ड्रिस्डेन शहरात तीन जणांच्या एका ग्रुपने हिटलरचा खजिना शोधून काढल्याचा दावा केला आहे. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या नाझी सैनिकांनी रशियावर हल्ला करून तेथील विशेष 'अॅम्बर रूम' मधून मोल्यवान हिरे, रत्न आणि मोल्यवान दागिणे लुटले होते. रशियाचे अॅम्बर रूम जगभरात सर्वात मोल्यवान रत्न, हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या रूमची बांधणी सोव्हिएत युनियनचे राजा फ्रेड्रिक यांनी 1701 मध्ये केली होती. या रुमच्या भिंती सुद्धा सोने, हिरे आणि रत्नांनी मढलेल्या होत्या. या खजिन्याची एकूण किंमत 1800 कोटींपेक्षा अधिक आहे. 
 
>> खजीना शोधून काढण्याचा दावा करणाऱ्या तिघांची नावे लियोनार्ड ब्लयुम (73), गुंटर एकार्ट (67) आणि पीटर लोर (71) अशी आहेत. 
>> जियो-रडार स्पेशलिस्ट पीटर लोर यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांना 2001 मध्ये या ठिकाणी खजिना दडल्याची माहिती मिळाली होती. यानंतरच त्यांनी चौकशी सुरू केली. 
>> पीटर यांनी सांगितले, ड्रिसडेनमध्ये खजिन्याचा शोध घेताना एकाच साइटवर अनेक प्रकाचे जाळे दिसून आले. त्यामुळे, खजिना त्याच ठिकाणी लपल्याचा संशय वाढत गेला. 
>> खजीना कोनिंसबर्गच्या एका अंडरग्राउंड रेलवे लाइनवर लपवण्यात आला. त्याचे काही अवशेष त्यांना सापडले आहेत. 
>> याच ठिकाणी जर्मनीचा आणखी एक तानाशहा क्राइसर विलहेमचा खजिना देखील लपला असावा असा अंदाज यांनी तिघांनी लावला आहे. 
>> टीमला रेल्वे लाइनखाली एक टनेल आणि जवळपासच्या जुन्या झाडांवर स्टीलच्या दोऱ्या देखील सापडल्या आहेत. या तिघांचे दावे ऐकूण आता जर्मनी सरकारनेही या जागेचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत.
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, रशियाच्या त्या अॅम्बर रूमची प्रतिकृती व आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...