आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरवलेल्या बहिणींची भेट; एक हॉलीवूड अभिनेत्री, डीएनए चाचणीतून नात्यावर शिक्कामोर्तब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - लहानपणी दोन जुळ्या बहिणींची ताटातूट झाली. एक फ्रान्समध्ये, तर दुसरी अमेरिकेत वाढली. दोघीही निरनिराळ्या पद्धतीने जगत होत्या. यादरम्यान एक बहीण शिक्षणासाठी लंडनला गेली, तर दुसरी हॉलीवूडमध्ये अभिनेत्री होते. एकेदिवशी लंडनमध्ये शिकणारी बहीण आपल्या जुळ्या बहिणीच्या चित्रपटाचे ट्रेलर पाहते, तेव्हा तिला आश्चर्याचा धक्काच बसतो.

आपणास हिंदी चित्रपट 'सीता और गीता' किंवा 'चालबाज'शी साधर्म्य असणारी ही कथा वाटेल. मात्र, हरवलेल्या दोन जुळ्या बहिणी अनाइस बॉर्डियर आणि समंथा फटरमॅन यांची ही खरीखुरी कहाणी आहे.

लहानपणी या दोन जुळ्या बहिणींना दोन वेगवेगळ्या दांपत्यांनी दत्तक घेतले होते. लहान वयामुळे दोघींनाही एकमेकींविषयी काहीच आठवत नाही. दोघी विभक्त झाल्यानंतर एक अमेरिकेत, तर दुसरी फ्रान्समध्ये राहू लागली. यादरम्यान हॉलीवूडमध्ये राहणारी समंथा हॉलीवूडमध्ये अभिनेत्री झाली, तर फ्रान्समध्ये वाढलेली अनाइस लंडनमध्ये शिक्षण घेत आहे.

अनाइसने आपल्या फेसबुक अकाउंटवर हॉलीवूड चित्रपट '२१ अँड ओव्हर'चे ट्रेलर शेअर केले. यादरम्यान ट्रेलमरमध्ये तिच्यासारख्या दिसणा-या समंथावर तिचे लक्ष गेले. याआधीही तिच्या मैत्रिणींनी समंथाविषयी तिला सांगितले होते, मात्र त्यावर तिचा विश्वास बसला नव्हता. अशात ट्रेलर पाहिल्यानंतर अनाइसला फेसबुकवर समंथाने संदेश पाठवला व नंतर दोघींनी भेट घेतली. दोघींनाही परस्परांबद्दल इतके आकर्षण वाटत होते की कधी एकदा भेट होईल, या भावनेतून त्यांनी या भेटीसाठी प्रयत्न केले होते.

दोघींनी एकमेकींविषयी माहिती दिल्यानंतर त्यांचा जन्म एकाच दिवशी दक्षिण कोरियात झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर त्यांना वेगवेगळ्या कुटुंबांनी दत्तक घेतले होते. भेटल्यानंतर दोघींनी डीएनए चाचणी केली. त्यात त्या जुळ्या असल्याचे स्पष्ट झाले.

अनाइस म्हणाली, आम्हा दोघींचा जन्म १९ नोव्हेंबर १९८७ रोजी सेऊलमध्ये झाला होता. लहानपणी आम्ही काही कारणावरून विभक्त झालो. सोशल मीडियामुळे आमची भेट होऊ शकली.