आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील मिसीसिपी प्रांतात गोळीबार, पोलिस प्रमुखांसह 8 जणांचा मृत्यू; हल्लेखोरास अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिंकन काउंटी (मिसीसिप्पी) - अमेरिकेतील मिसीसिप्पी प्रांतात एका व्यक्तीने अचानक बेछूट गोळीबार सुरू केला. या घटनेत 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच इतर 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा देखील समावेश आहे. हल्लेखोराला पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. 
 
तीन विविध ठिकाणी गोळीबार
- अमेरिकेतील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हा प्रकार शनिवारी रात्री (भारतात रविवारी) घडला आहे. मिसीसिपी पोलिस प्रवक्त्यांनी हा गोळीबार 3 विविध ठिकाणी एकाच व्यक्तीने केला असे स्पष्ट केले. 
- पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, आतापर्यंत या गोळीबारात 8 जणांचा मृत्यू झाला असून रुगणालयात 5 जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. 
 
दहशतवादी हल्ला नाही
- पोलिसांनी हल्लेखोराला चक्क 3 किमी पाठलाग करून अटक केली. हल्लेखोराचे नाव विली कोरी गॉडबोल्ट असून तो एक सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात हत्या, दरोडा आणि इतर अनेक प्रकारचे गंभीर आरोप आहेत. काही दिवसांपूर्वीच तो तुरुंगाबाहेर पडला होता. 
- प्राथमिक माहितीप्रमाणे, पोलिसांनी या हल्ल्यास दहशतवादी हल्ला संबोधण्यास नकार दिला. दरम्यान, हल्लेखोराला अटक करण्यात आली असून पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...